महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Tech Team

Published : 5 hours ago

ETV Bharat / technology

लहान मुलांसामोर मोठ्यानं वाचन केल्यास नातेसंबंधात सुधारणा - संशोधक - READING ALOUD WITH CHILDREN

READING ALOUD WITH CHILDREN : लहान मुलांसमोर मोठ्यानं वाचन केल्यास नातेसंबंधांत सुधारणा होत असल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केलाय. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने शिफारस केली, की बालरोगतज्ञांनी जन्मापासूनच सामायिक वाचन करण्यास प्रोत्साहन द्यावं.

READING ALOUD WITH CHILDREN
प्रातिनिधिक छायाचित्र (INS)

न्यूयॉर्क READING ALOUD WITH CHILDREN :संशोधकांच्या एका चमूनं पालकांना त्यांच्या नवजात लहान मुलासमोर मोठ्यानं वाचायला हवं असं म्हटंलय. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या त्याचा परिणाम होत असल्याचा दावा देखी संशोधकांनी केलाय. याबाबत अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनं काही शिफारसी केल्या आहेत.

वाचनामुळं होतो बंध निर्माण : जन्मापासूनची सुरुवातीची वर्षे मुलांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात दोघांमध्ये चांगला बंध निर्माण होतो, कारण याच काळात मुलांच्या मेंदूचा विकास होतो. अमेरिकन संशोधकांनी असं म्हटलं आहे की, या महत्त्वाच्या काळात पालकांनी लहान मुलांसमोर मोठ्यानं वाचन केल्यास नातेसंबंधांना प्रोत्साहन मिळतं. या वाचनाचे आयुष्यभर परिणाम होण्याची शक्यता असते. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनं शिफारस केली की, बालरोगतज्ञांनी सामायिक वाचन जन्मापासून सुरू करून किमान बालवाडीपर्यंत सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे.

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त : नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, मेंदूला चालना देण्यासाठी वाचन करणं महत्त्वाचं आहे. या संशोधनाच्या प्रमुख लेखक पेरी क्लास म्हणाल्या की, लहान मुलांसोबत एकत्र वाचन केल्यानं भाषा आणि संभाषणात्मक क्षण दैनंदिन जीवनाच्या फॅब्रिकमध्ये तयार होतात. हे बंध मजबूत होऊन मुलांच्या मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. अहवालाचे सह-लेखक आणि अर्ली चाइल्डहुड परिषदेचे अध्यक्ष दीपेश नवसारिया म्हणाले की, रंगीबेरंगी चित्रे आणि समृद्ध भाषेनं भरलेल्या उच्च दर्जाच्या पुस्तकाची पानं उलटणं उत्तम आहे. टचस्क्रीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं लोकप्रिय असू शकतात, परंतु ते सामान्यतः मुलांना वेगळं ठेवतात. त्यामुळं समान नातेसंबंध निर्माण करणारे फायदे त्यामुळं होतं नाहीत.

हे वाचलंत का :

  1. ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 EF लाँच, जाणून घ्या खास फिचर - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED
  2. आधार, पॅन कार्डबाबत केंद्र सरकाचा मोठा निर्णय; उचललं 'हे' पाऊल - Aadhaar PAN Card
  3. तुमचा मोबाईल फोन स्लो चार्ज होतोय?, बॅटरी बॅकअप कमी होण्याचं कारण काय? - Why Mobile Phone Charging Slowly

ABOUT THE AUTHOR

...view details