ETV Bharat / entertainment

'घरात माझी किंमत 40 हजारांची नाही', टास्क दरम्यान जान्हवी किल्लेकरनं रडत पाटी तोडली... - janhavi cried during task - JANHAVI CRIED DURING TASK

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मधील आजच्या 30 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक मजेशीर टास्क पाहायला मिळणार आहे. या टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकर ही रडताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi  5
बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5 - Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 5:06 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या फिनालेला आजपासून सुरुवात होणार आहे. आज 30 सप्टेंबरपासून बिग बॉसच्या घरात अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आजच्या एपिसोडचा प्रोमो बिग बॉस निर्मात्यांनी त्यांच्या ऑफिशियल इंन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. प्रोमोनुसार, आजच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'च्या आदेशानुसार प्रत्येक सदस्याला स्वतःची किंमत ठरवावी लागणार आहे. या टास्कदरम्यान, घरातील प्रत्येक सदस्यांची किंमत लागली जाणार आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकरच्या वाट्याला 40 हजारांची किंमत येते, यानंतर ती ही स्वीकारण्यास स्पष्ट नकार देते. व्हायरल झालेल्या प्रोमोत जान्हवी ही खूप रडताना दिसत आहे.

जान्हवी किल्लेकर टास्कदरम्यान रडली : प्रोमोच्या सुरुवातीला अभिजीत म्हणतो, "दोन लाखांची पाटी मी अंकिताला देईन." यावर निक्की तांबोळीही अभिजीतला म्हणते, "मग तू चाळीस हजारांची पाटी जान्हवीला देणार आहेस का?" अभिजीत निक्कीला म्हणतो, "माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही." यावरून डीपी दादा उर्फ धनंजय पोवार अभिजीतला म्हणतो, "मलाही वाटतं की, तू ही गोष्ट करावी." यावरून जान्हवी ही रडत बिग बॉसला म्हणते, "या घरातील चाळीस हजारांची किंमत माझी नाही. मी चाळीस हजारांची पाटी स्वीकारणार नाही." संतापलेली जान्हवी ही तिच्या हातातली 40 हजारांची पाटी तोडून टाकते आणि खूप रडते.

पंढरीनाथ कांबळे पडला घराबाहेर : दरम्यान, आजच्या एपिसोडमध्ये कोणाची किंमत किती ठरेल? हे पाहणं खूप मजेशीर असणार आहे. 'बिग बॉस मराठी 5'चा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. 'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. रविवारी बिग बॉसच्या घरातून प्रसिद्ध कॉमेडियन पंढरीनाथ कांबळेनं एग्झिट घेतली. आता त्यानंतर निक्की तांबोळी, वर्षा ऊसगावकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर असे 7 स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. आता येत्या रविवारी 'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. ड्रामा क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार एन्ट्री - निक्की तांबोळीचा वाजणार बॅन्ड - bigg boss marathi 5
  2. 'बिग बॉस मराठी 5'च्या विजेत्यांची नावे आली समोर, व्हायरल पोस्टमागील जाणून घ्या सत्य... - BIGG BOSS MARATHI 5
  3. 'बिग बॉस'च्या घरात महाचक्रव्यूह टास्कसाठी पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाण यांचा संघर्ष, नवीन प्रोमो रिलीज - BIGG BOSS MARATHI 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.