मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी अचानकपणे कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर ते एखादे अवैध काम करण्यास प्रवृत्त होण्याची संभावना सुद्धा आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडं कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नये. अन्यथा त्यांचं नुकसान होऊ शकतं. ह्या आठवड्यात आपण आपला जास्त पैसा फुटकळ कामात खर्च करण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना त्यांच्या नात्यात थोडा तणाव असल्याची जाणीव होईल. त्यामुळं त्यांचं नातं तुटू शकतं. नंतर त्याचा आपणास पश्चाताप सुद्धा होऊ शकतो. विवाहितांनी ह्या आठवड्यात शांत राहावं. ह्या व्यतिरिक्त आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी जोडीदाराच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं त्यांच्यातील सर्व गैरसमज दूर होऊ शकतील.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांचे सकारात्मक विचार त्यांची सर्व कामे पूर्ण करण्यास त्यांना मदत करतील. याउलट नकारात्मक विचार त्यांनी पूर्ण केलेल्या कामात खोडा सुद्धा घालतील. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांना थोडं दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा आठवडा व्यापारासाठी चांगला आहे. त्यांचा परदेशात ओळखी होऊ शकतात. ह्या आठवड्यात आपल्या ओटीपोटाशी संबंधित एखादी समस्या आपणास त्रस्त करू शकते. आपण जर त्याकडं दुर्लक्ष केलं तर त्रास वाढू शकतो. ह्या महिन्यात प्रवास केल्यानं आपणास थकवा सुद्धा येऊ शकतो. आपणास जर एखाद्या कामासाठी कर्ज घ्यावयाचं असेल तर ते आपणास ह्या आठवड्यात मिळू शकते. त्यामुळं आपली सर्व कामे होऊ शकतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. असं असलं तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकतं. ह्या आठवड्यात प्रणयी जीवनात दुरावा वाढू शकतो. विवाहितांनी त्यांचं नातं संभाळण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानं आपण जोडीदारासह सुखात नांदू शकाल.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ज्या व्यक्ती नोकरीत नवीन संधीची वाट बघत आहेत, त्यांना मेहनत वाढवावी लागेल. ह्या व्यतिरिक्त त्यांना वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास रक्त वाहिन्यांशी संबंधित एखादा जुनाट विकार त्रस्त करू शकतो. तेव्हा त्याकडं दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करून घ्यावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास जर आपल्या घराचं नूतनीकरण करावयाचं असेल तर अंदाजपत्रक बनवूनच ते करावं. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. काही कारणाने ते मानसिक तणावाखाली वावरत असण्याची संभावना आहे. प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेची वागणूक समजू शकणार नाही. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जोडीदाराच्या सहवासात एकांतात वेळ घालविण्याचा प्रयत्न कराल.
कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखाद्या नवीन प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. त्यामुळं वरिष्ठांच्या नजरेत आपली वेगळी ओळख निर्माण होईल. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. त्यांच्या नवीन ओळखी होऊ शकतात, ज्या व्यापारवृद्धीस उपयुक्त ठरतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं लागेल. अन्यथा आपणास डोके, पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात घराच्या नूतनीकरणावर आपला जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात मेहनत वाढवावी लागेल. ह्या आठवड्यात युवकांच्या आयुष्यात अशा एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो कि जिला आपण आपल्या मनातील गोष्टी सांगू शकाल. विवाहितांसाठी आठवडा काहीसा त्रासदायी आहे. असं असलं तरी सामंजस्याने आपण हे त्रास सहजपणे दूर करू शकाल.
सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. कदाचित वरिष्ठांच्या एखाद्या वक्तव्याने आपण द्विधेत राहू शकता. व्यापाऱ्यांना अपेक्षित फल प्राप्तीसाठी आव्हानांचा सामना करावा लागेल. ह्या आठ्वड्यात एखाद्या कार्यासाठी आर्थिकदृष्ट्या कठोर पाऊले आपणास उचलावी लागू शकतात. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात डोके, पोट, पायाची दुखणी त्रस्त करू शकतात. अशा वेळेस त्याकडं दुर्लक्ष न करता चांगल्या डॉक्टरांकडून इलाज करून घ्यावा. प्रेमीजनांना आपला अहंकार बाजूस ठेवावा लागेल, अन्यथा त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराशी समन्वय साधावा लागेल.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना व्यापारानिमित्त भरपूर प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जास्त कष्टदायी आहे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण नियमितपणे योगासने करावीत. हा आठवडा आर्थिक खर्चाचा आहे. आपण आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी काही पैसे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. प्रेमीजनांच्या नात्यात आलेली कटुता आणि गैरसमज ह्या आठवड्यात दूर होऊ शकतात. त्यामुळं आपलं प्रणयी नाते अधिक दृढ होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकाल.
-----
तूळ (Libra) : हा आठवडा आपणास चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री सावध राहावं लागेल. ह्या दरम्यान आपल्या वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणं आपण टाळावं. व्यापाऱ्यांना सुद्धा ह्या आठवड्यात आपली कामं सावधपणे करावी लागतील. अन्यथा त्यांना व्यापारात कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. ह्या आठवड्यात आपणास ऋतुजन्य ताप, सर्दी, खोकला इत्यादी समस्या त्रस्त करू शकतात. त्यामुळं आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपण जर जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्व बाजू नीट तपासून मगच पुढे जावे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी इतर व्यर्थ गोष्टींवरून आपलं लक्ष हटवावं लागेल. असं केल्यानेच आपण अध्ययनात यशस्वी होऊ शकाल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेशी असलेल्या नात्यामुळं काहीसे बेचैन राहतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं आपली मानसिक शांतता भंग पावेल. अशावेळी संयमात राहणे शहाणपणाचे ठरेल.
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. तेव्हा त्या बाबतीत पुढे जाऊ नये. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा सामान्यच आहे. त्यांनी फक्त आपला व्यापार पुढे नेण्यासाठी परिश्रम करत राहावे. सट्टा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ज्या व्यक्तींनी एखादे कर्ज घेतलं असेल त्यांना कर्जफेड करण्यास आठवडा अनुकूल आहे. प्रेमीजनांची पूर्वीची प्रेमिका त्यांच्याकडं परतण्याची संभावना असली तरी आता आपल्यात पूर्वी सारखे प्रेम राहणार नाही. विवाहितांनी पूर्वीच्या गोष्टी विसरून नाते दृढ करण्याचा प्रयत्न करणे हितावह होईल.
धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ज्या व्यक्तींना नोकरीत बदल करावयाचा आहे त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास जर सट्टा किंवा शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती विचारपूर्वक करावी. व्यापारात एखाद्या चुकीमुळं आपले नुकसान होऊ शकते. ह्या आठवड्यात आपण नेत्रविकार किंवा छातीशी संबंधित विकाराने त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात निष्कारण तणाव घेणं टाळल्यास आपलं आरोग्य उत्तम राहू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ते अति आत्मविश्वासामुळं अयशस्वी होण्याची संभावना आहे. एखाद्या गैरसमजामुळं आपल्या प्रेमिकेशी आपले भांडण होण्याची संभावना असून त्यामुळं नात्यातील दुरावा सुद्धा वाढू शकतो. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या जोडीदारासह बाहेर फिरावयास सुद्धा जाऊ शकाल.
मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या योग्यतेनुसार चांगली संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे बदल करणं टाळावं. ह्या आठवड्यात शेअर्स किंवा सट्टा बाजारात केलेली गुतंवणूक नुकसानदायी होऊ शकते. ज्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी ह्या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी. आपल्या दिनचर्येत योगासन व व्यायामास विशेष स्थान द्यावे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना नव्याने संधी मिळू शकते. आपण एखाद्या संशोधनात सहभागी होऊ शकता. प्रणयी जीवनात आपल्या प्रेमिकेशी जर दुरावा निर्माण झाला असेल किंवा आपण एखाद्या नवीन प्रेमिकेच्या शोधात असाल तर आपल्या जीवनात नवीन प्रेमिकेचा शिरकाव होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकता.
कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपणास चांगला आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलावयाची आहे, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा उन्नतीची संधी मिळू शकेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित एखादी समस्या आपणास त्रास देऊ शकते. ह्या आठवड्यात घराचं नूतनीकरण करण्यात आणि अनावश्यक वस्तूंच्या खरेदीत आपला खर्च जास्त होऊ शकतो. एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपल्या कार्यालयातील एखाद्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढून त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. हे भांडण चार भिंतीतच राहील ह्याचा प्रयत्न करावा.
मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. शासकीय नोकरीत असणाऱ्या व्यक्ती जर नोकरीत बदल करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. व्यापाऱ्यांसाठीआठवडा चांगला आहे. आपण आपल्या व्यापारास पुढे नेण्यासाठी परिश्रम करत राहावे. ह्या आठवड्यात आपणास एखादी दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना आठवडा अनुकूल आहे. आपणास जर एखादा व्यवसायाभिमुख विषयाचा अभ्यास करावयाचा असेल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकता. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्य आहे. आपण आणि आपल्या प्रेमिके दरम्यान काही गैरसमज झाले असतील तर ते ह्या आठवड्यात दूर होऊ शकतील. वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या जोडीदारावर शंका घेण्या ऐवजी नात्यात आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
हेही वाचा -