मेष (ARIES) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला, ताप यामुळं प्रकृती बिघडेल. धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळं सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगल आणि सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.
वृषभ (TAURUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशम भावात असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबात सुख, शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार - व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख आणि संपर्क यांमुळं लाभ होईल. संतती आणि पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
मिथुन (GEMINI) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल आणि फायदा सुद्धा होईल. संततीकडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात प्राप्ती वाढेल.
कर्क (CANCER) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टम भावात असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळं प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र आणि कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.व्यापार-व्यवसायात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. मंगल कार्यात सफलता मिळेल.
सिंह (LEO) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडं लक्ष द्यावं लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्यानं आपलं मन अशांत होईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
कन्या (VIRGO) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश आणि कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार-व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे इत्यादींची खरेदी केल्यानं खुश व्हाल. मित्रांसह प्रवासाचा आनंद लुटाल.
तूळ (LIBRA) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भावात असेल. घरातील सुखा-समाधानाचं वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता-पिताकडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
वृश्चिक (SCORPIO) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भावात असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर-सट्टा यात न पडणं हिताचं राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.
धनू (SAGITTARIUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या असेल. आज शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण चांगल राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. वेळेवर जेवण आणि झोप न मिळाल्यामुळं स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.
मकर (CAPRICORN) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्यानं दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्तीविषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचं सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.
कुंभ (AQUARIUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.
मीन (PISCES) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावं लागेल. संताप आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.
हेही वाचा -