क्वालालंपूर ICC U19 Womens World Cup Final : आयसीसी महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2025चा अंतिम सामना भारताचा 19 वर्षांखालील महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात 2 फेब्रुवारी (शनिवार) रोजी क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल इथं खेळला जाईल. भारतीय महिला 19 वर्षांखालील क्रिकेट संघानं एका शानदार मोहिमेनंतर आणखी एका ऐतिहासिक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ 2024 च्या 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद कायम राखण्याचं ध्येय ठेवेल, जिथं त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. हा सामना गेल्या वर्षीच्या पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेइतकाच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
The final two captains standing in Kuala Lumpur 🙌
— ICC (@ICC) February 1, 2025
All set for the #U19WorldCup Final 🏆
More 👉 https://t.co/f2kWvrguqv pic.twitter.com/ji22LemwiP
सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव : या स्पर्धेत आतापर्यंत आठ पैकी आठ सामने जिंकून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीत इंग्लंडला नऊ विकेट्सनं हरवून आपली ताकद चमकदारपणे दाखवली. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेनं सात विजयांसह आणि एक सामना पावसामुळं रद्द करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सनं हरवलं आणि शानदार खेळ केला.
The smiles say it all 😄
— ICC (@ICC) January 31, 2025
Pure joy in the India camp as they march into the #U19WorldCup 2025 Final 👏
Read more ➡️ https://t.co/NQ4NfQ2INA pic.twitter.com/igGlBCdUeS
भारतीय संघ स्पर्धेत अपराजित : आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ रविवारी होणाऱ्या महिला अंडर-19 T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना करताना सलग दुसरं विजेतेपद जिंकण्याचं लक्ष्य ठेवेल. भारतानं आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, त्यांनी या स्पर्धेत त्यांचे सर्व सहा सामने जिंकले आहेत. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतानं वेस्ट इंडिज (नऊ विकेट्स), मलेशिया (10 विकेट्स), श्रीलंका (60 धावा), बांगलादेश (8 विकेट्स), स्कॉटलंड (150 धावा) आणि इंग्लंड (सेमीफायनलमध्ये नऊ विकेट्स) यांच्यावर सहज विजय मिळवला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील अंडर 19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामना कधी आणि कुठं होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील अंडर 19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामना 2 फेब्रुवारी (रविवार) रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथील बायुमा ओव्हल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळला जाईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यासाठी नाणेफेक सकाळी 11:30 वाजता होईल.
𝗢𝗡𝗟𝗬 𝗧𝗪𝗢 𝗥𝗘𝗠𝗔𝗜𝗡 👀
— ICC (@ICC) January 31, 2025
South Africa and India will lock horns in the Final of the #U19WorldCup 2025 🇿🇦 🇮🇳 pic.twitter.com/hedKUa4qAh
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील अंडर 19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामना लाईव्ह कुठं आणि कसा पाहयचा?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील अंडर 19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामन्याचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत, जे त्यांच्या टीव्ही चॅनेलवर हे थेट प्रक्षेपण प्रदान करेल. तसंच या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टारवर पाहता येईल.
हेही वाचा :