ETV Bharat / state

दुसऱ्याशी बोलत असल्याचा संशय, प्रियकरानं केली प्रियसीची हत्या - NAVI MUMBAI CRIME NEWS

प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai Murder News
प्रियकराने केला प्रेयसीवर वार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 10:56 PM IST

नवी मुंबई : ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचं दुसऱ्या मुलांसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून, प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केल्याची घटना नवीन पनवेल शहरात घडली आहे. तर प्रेयसीवर वार करून आरोपी प्रियकराने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.

काय आहे प्रकरण? : संबधित घटना नवी मुंबई नजीकच्या नवीन पनवेलमध्ये घडली आहे. आरोपी प्रियकराचे एका तरूणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र 3 महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप झाल्यामुळं प्रेयसी ही आरोपी प्रियकराबरोबर बोलणं टाळत होती. याचाच राग आरोपी प्रियकराच्या मनात खदखदत होता. प्रेयसीचं दुसऱ्या कोणत्यातरी आणखी एका मुलासोबत प्रेमसंबंध असून ती त्याच्याशी बोलत असल्याचा संशय आरोपी प्रियकराला आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.

थेट गाठलं प्रेयसीचं घर आणि तीच्यावर केला हल्ला : ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी ही दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय आरोपी प्रियकराला होता. दिवसेंदिवस हा संशय वाढतंच चालला होता. याच संशयातून रागाच्या भरात प्रियकराने थेट प्रेयसीचं घर गाठलं. तिच्या राहत्या घरी 31 जानेवारीला जाऊन, दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असं बोलून तिच्याशी वादविवाद केला आणि शिवीगाळ करत प्रेयसीला मारहाण केली. यावेळी प्रेयसीच्या घरी तिची आई, बहीण देखील होती. संध्याकाळी पावणे सहा ते साडेसहापर्यत प्रियकराने मृत प्रेयसीला शिवीगाळ करत तिच्या गळ्यावर वार केला. अशी माहिती स्मिता ढाकणे यांनी दिली.

प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न : प्रेयसीच्या गळ्यावर वार केल्यानंतर प्रियकराने स्वतःच्या हातावर गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रियकराला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेयसीचा मृत्यू झाल्यावर पोलिसांनी प्रियकराच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल उपचार सुरू असल्याची माहिती, खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. पुणे हादरलं! मुलासमोरच कात्रीनं वार करून केली पत्नीची हत्या, थरारक व्हिडिओ व्हायरल
  2. गरोदर महिलेची आत्महत्या नाही तर खून; सासरच्या मंडळींनीच हत्या केल्याचं तपासात झालं उघड
  3. सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! ५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या लहान भावाचा केला खून, आरोपी भाऊ गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.