CHOCOLATE DAY: प्रेम आपुलकी आणि आनंदाचं प्रतीक म्हणून चॉकलेट डे मानलं जातं. अनेक जण आपल्या प्रियजनांना, मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना चॉकलेट देऊन प्रेमाच्या आपुलकीची देवाणघेवाण करतात. नात्यात गोडवा मिळण्यासाठी प्रेमवीर, विवाहीत जोडपे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट देऊन नात्यातील गोडवा वाढवतात. रागावलेल्या आणि रुसलेल्या बायकोला तसंच प्रेयसीला खुश करायचं असेल तर चॉकलेट उत्तम पर्याय आहे. या दिवशी भरपूर चॉकलेट देऊन तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता.
![CHOCOLATE DAY VALENTINES WEEK VALENTINES DAY 2025](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-02-2025/23501521_cho.jpg)
चॉकलेड डे च्या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना चॉकलेट देवू शकतात. तसंच सुंदर आणि मधूर रोमॅंटिक चॉकलेड डे संदेश पाठवू शकतात. तुमचा जोडीदार इतरत्र राहत असेल तरी तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून मेसेज, वॉलपेपर, कविता इत्यादी पाठवून त्यांचा चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. तसंच ऑनलाईन एखादं मोठं चॉकलेट त्यांना पाठवू शकता. यामुळे प्रेमतील गोडवा आणखी वाढेल.
![CHOCOLATE DAY VALENTINES WEEK VALENTINES DAY 2025](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-02-2025/23499493_wb_1.jpg)
चॉकलेट खाण्याचे एक ना अनेक फायदे आहेत. चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन आणि कॅफिनचं प्रमाण असते. जे मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या एंडोर्फिनचे स्त्राव वाढवते. यामुळे तणाव कमी होतो.
![CHOCOLATE DAY VALENTINES WEEK VALENTINES DAY 2025](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-02-2025/23499493_wb_13.jpg)
- अशाप्रकारे करा चॉकलेट डे साजरा
- चॉकलेट बुके: चॉकलेट डे निमित्तानं तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी चॉकलेट बुके तयार करू शकता. प्रिय व्यक्तींना खुश करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. चॉकलेट बुके तयार करण्यासाठी विविधप्रकारचे 10 ते 15 चॉकलेट घ्या आणि स्वत: चॉकलेट बुके तयार करा. तसंच बाजारातून देखील तुम्ही चॉकलेट बुके खरेदी करू शकता. बाजारात विविध प्रकारचे चॉकलेट बुके उपलब्ध आहेत.
![CHOCOLATE DAY VALENTINES WEEK VALENTINES DAY 2025](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-02-2025/23501521_chp.jpg)
- चॉकलेट हॅम्पर: तुम्हाला तुमच्या पार्टनरला खुश करायचं असेल तर विविध चॉकलेट्स भरलेला चॉकलेट हॅम्पर देवू शकता. चॉकलेट्स हॅम्परमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या चॉकलेट सोबत चॉकलेट कुकीज, चॉकलेट ड्रिंक्स, चॉकलेट परफ्यूम देवू शकता. हे तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी खास भेट ठरू शकते.
- चॉकलेट केक: बऱ्याच जणांना केक खाणं फार आवडते. चॉकलेट पासूनही विविध प्रकारचे केक्स तयार केले जाऊ शकतात. बाजारातही अनेक व्हेरायटीचे केक उपलब्ध आहेत. मात्र, यंदाचा चॉकलेट डे स्पेशल करण्यासाठी तुम्ही स्वतः आपल्या हाताने केक तयार करू शकता.
- चॉकलेट दागिने: जर तुम्हाला या प्रसंगी तुमच्या जोडीदाराला वेगळ्या पद्धतीने आश्चर्यचकित करायचे असेल तर तुम्ही त्यांना चॉकलेटचे दागिने भेट देऊ शकता. गिफ्ट शॉपमध्ये तुम्हाला चॉकलेट इअररिंग्जपासून नेकलेस, ब्रेसलेट इत्यादी अनेक पर्याय मिळतील.
- चॉकलेट स्पा: चॉकलेट डे निमित्त, तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेट स्पा बुक करू शकता. अर्थात, या स्पा नंतर, त्याचा मूड तर ताजा होईलच, पण तुमच्यावरील त्याचे प्रेमही वाढेल.
- चॉकलेट खाण्याचे फायदे
- रक्तदाब नियंत्रणात राहते
- डार्क चॉकलेटच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.
- हृदविकाराच आणि पक्षाघाताचा धोका कमी
- त्वचेसाठी चॉकलेट उपयुक्त आहे
- रक्त गोठण्याचा धोका कमी
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ