ETV Bharat / state

शेतकऱ्यानं तयार केला 'अनोखा ट्रॅक्टर', मात्र आता उत्पादनासाठी येतायेत अडचणी - NAMDEV ANERAO MADE TRACTOR

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर या गावातील नामदेव आनेराव यांनी शेतकऱ्यांसाठी अनोखा ट्रॅक्टर तयार केलाय.

Farmer Namdev Anerao
शेतकरी नामदेव आनेराव (ETV Bharat Reoprter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 10:41 PM IST

छत्रपती संभाजीनगर : आधुनिक काळातही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यावर नामदेव आनेराव या शेतकऱ्यानेच भन्नाट शक्कल लढवून अनोखा ट्रॅक्टर तयार केलाय. जवळपास वीस वर्षे अनेक प्रयोग त्यांनी करून केलेल्या या ट्रॅक्टरला पेटंट मिळालंय. डिझेल आणि बॅटरी या दोन्ही प्रकारात चालवता येणार आहे. अथक परिश्रम करून तयार केलेला हा ट्रॅक्टर सज्ज झाला असला तरी, विक्रीसाठी आण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे. अनेक प्रयत्न केलं तरी भांडवलदार मिळत नसल्यानं आता मार्ग सुचत नसल्याचं नामदेव आनेराव यांनी सांगितलं.

शेतकऱ्यानं केला अनोखा प्रयोग : शेतातील उभ्या पिकांमधून हा ट्रॅक्टर शेती कामे अगदी सहज आणि आरामदायी पद्धतीने पूर्ण करतो. शेतकरी बैलांच्या माध्यमातून करणारी कामे हा ट्रॅक्टर अगदी सहजपणे करतो. जवळपास सहा पद्धतीची कामे यामाध्यमातून केली जातात. ज्यामध्ये फवारणी, बियाणे पेरणीचा समावेश आहे. एक एकर शेतात काम करण्यासाठी जवळपास दीड लिटर डिझेल ट्रॅक्टरसाठी लागते. बाजारात असलेल्या इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत अतिशय स्वस्तदरात हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. कमी वेळात अधिक क्षेत्रफळात हा ट्रॅक्टर जास्त काम करू शकतो अशी माहिती, प्रयोगशील शेतकरी नामदेव आनेराव यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना प्रयोगशील शेतकरी नामदेव आनेराव (ETV Bharat Reoprter)

वीस वर्ष केला प्रयोग : दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले नामदेव यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. 2002 पासून त्यांनी शेतीकाम करणारे यंत्र तयार करण्याची इच्छा मनी बाळगली आणि काम सुरू केलं. पदरचे पैसे खर्च करून वेगवगेळ्या पद्धतीचे प्रयोग त्यांनी केले. आतापर्यंत त्यांनी चार पद्धतीचे वेगवेगळे ट्रॅक्टर तयार केले, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी दूर करत वेगवगेळ्या पद्धतीचे बदल करत, अखेर 2022 मध्ये ट्रॅक्टर करून पूर्ण झाला. डिझेल आणि बॅटरी या दोन्ही प्रकारात ट्रॅक्टर कार्य करते. ही ट्रॅक्टर चार तास डिझेलवर चालल्यानंतर पुढे चार तास ती बॅटरीच्या माध्यमातून काम करू शकते. या प्रयोगाला पेटंट देखील मिळालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कडक जमिनीवर देखील सहज काम करणं शक्य होणार असल्यानं मोठी मदत होईल असा विश्वास शेतकरी नामदेव आनेराव यांनी व्यक्त केला.

टॅक्टर पूर्ण मात्र आर्थिक अडचण झाली निर्माण : वीस वर्ष प्रयत्न करून टॅक्टर तयार झाला, मात्र यादरम्यान आर्थिक अडचण निर्माण झाली. स्वतःच्या नावावर असलेली सहा एकर जमीन आणि भावाच्या जनावर असलेली शेतजमीन देखील गहाण ठेवली. इतके वर्ष मेहनत केल्यावर तयार झालेले ट्रॅक्टर बाजारात येण्यासाठी सज्ज झाले. मात्र, पैसे नसल्यानं उत्पादन घेणं शक्य होत नाही. त्यात बँक आणि सरकार दरबारी कुठलीही मदत मिळत नसल्यानं पुढे जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. एका नामांकित कंपनीने तीन कोटी रुपयात पेटंट आणि इतर अधिकारी मागितले. मात्र जवळपास दीड कोटींच्या आसपास खर्च आतापर्यंत झाला. त्यावर लागणारा कर पाहता हातात काहीच राहणार नसल्यानं त्यांनी प्रस्ताव नाकारला. सध्या स्थितीत 360 शेतकरी हा ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक आहेत. गुंतवणूकदार भेटले तर शेतकऱ्यांसाठी चांगलं करता येईल असं मत शेतकरी नामदेव आनेराव यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor
  2. महिंद्राने सादर केला 'बायोगॅस'वर चालणारा CBG ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचा डिझेल खर्च वाचणार - Biogas Powered CBG Tractor
  3. Modern Farming Machine : शेतकरी पिता-पुत्राचा अनोखा जुगाड; पिता-पुत्राने बनवले कोळपणी यंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.