हैदराबाद Cheapest plan of BSNL : रिलायन्स जिओ, एअरटेल तसंच व्होडाफोन आयडियाच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती जुलैपासून जवळपास 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळं नागरिकांच्या खिशाला भूर्दंड पडत आहे. म्हणूनच नागरिक आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडं वळताना दिसताय.हेच लक्षात घेऊन आम्ही BSNL च्या सर्वात स्वस्त प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यात 1 GB दैनिक डेटा तुम्हाला मिळतोय.
BSNL हा सर्वोत्तम पर्याय : BSNL चा प्लॅन Jio च्या तुलनेत अर्ध्या किमतीत येतो. जर आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर, BSNL चा रिचार्ज Jio जिओ सारखाचं सेवा देतोय. होय, येथे आम्ही भारत संचार निगम लिमिटेडच्या 52 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत. BSNL आपल्या ग्राहकांना 298 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह कॉल आणि डेटा लाभ देतं. या प्लॅनची वैधता पूर्ण 2 महिन्यांसाठी उपलब्ध नाही, परंतु 2 महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनसाठी हा स्वस्त पर्याय आहे. त्यामुळं, जर तुम्हाला महागड्या रिचार्जनं त्रस्त असाल तसंच तुम्ही स्वस्त रिचार्ज पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी BSNL हा सर्वोत्तम उपाय आहे.
वैधता 52 दिवस : BSNL चा हा प्रीपेड प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित डेटासह 52 दिवसांच्या वैधतेसह येतो.या पॅकमध्ये स्थानिक आणि STD वर अमर्यादित व्हॉइस कॉल केल्या जातात. यामध्ये दररोज 1GB डेटा आणि दररोज 100 SMS सुविधा आहे. या प्लॅनमध्ये इरॉस नाऊ मनोरंजन सेवांचं विनामूल्य सदस्यत्व देखील समाविष्ट आहे. ही योजना अमर्यादित डेटा आणि फोनवर जास्त बोलणाऱ्यांसाठी योग्य आहे.
हे वाचलंत का :