ETV Bharat / entertainment

पुण्यातील कॉन्सर्टपूर्वी सोनू निगमला झाला पाठदुखीचा त्रास, व्हिडिओ व्हायरल - SONU NIGAM

सोनू निगमनं इंस्टाग्रामवर त्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्याला पाठदुखीचा तीव्र त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sonu Nigam
सोनू निगम (Sonu Nigam Ayodhya Post Controversy (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 2, 2025, 10:47 AM IST

मुंबई - बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या पाठदुखीनं त्रस्त आहे. एका कॉन्सर्टदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. सोनूनं स्वतः ही माहिती त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यानं लिहिलं की, 'काही लोकांनी भाकीत केलं होतं की, हे वर्ष अपघात आणि वैद्यकीय समस्यांनी भरलेलं असेल. आता असच दिसत आहे, त्यांचं भाकित खर ठरलंय. मला असा स्थितीत देखील पुण्यातील स्टेजवर जावं लागलं. लोकांना ते खूप सोपे वाटतं पण शोबिजचे जग अडचणींनी भरलेलं आहे. आज माता सरस्वती मला आधार दे.'

सोनू निगम मसाज घेताना दिसला : व्हायरल झालेल्या व्हिडिओत सोनू निगम जिममध्ये वेळ घालवताना दिसत आहे. यासोबतच तो मसाजही घेत आहे. मसाजनंतर सोनूनं पुण्यात आपला संगीत कार्यक्रमही सादर केला. कॉन्सर्टमध्ये सोनू निगम हा छान दिसत होता. दरम्यान सोनूनं आतापर्यंत 800हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. पद्मश्रीनं सन्मानित झालेला सोनू निगम आजही संगीताच्या जगात खूप सक्रिय आहेत. त्याची अनेक गाणी ही लोकप्रिय झाली आहेत. सोनू निगम अनेकदा संगीत रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसतो.

सोनू निगमचे भारतात कुठे होणार कॉन्सर्ट : गाण्याव्यतिरिक्त, सोनू निगमनं चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सोनू निगमला इंस्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. त्याच्या सुंदर आवाजासाठी तसेच त्याच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वासाठी त्याला ओळखला जाते. अनेकदा तो आपले मत स्पष्ट बोलून दाखवत असतो. दरम्यान सोनू निगम एकदा मशिदीत नमाज अदा करण्यावरून वादात अडकला होता. सोनूनं हिंदीसह इतर भाषांमधील गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. आता 2025 मध्येही अनेक मोठ्या चित्रपटांच्या गाण्यांना तो आपला आवाज देणार आहे. सध्या तो वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या आवजाची जादू पसरत आहे. तसेच तो हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबईमध्ये म्यूझिक शो करणार आहे.

हेही वाचा :

  1. 'सौ साल पहले' कार्यक्रमासह सोनू निगमनं मोहम्मद रफींच्या 100 व्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
  2. महान तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
  3. राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न, सोनू आणि शंकर यांनी गायली भजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.