मुंबई : रामोजी फिल्म सिटीमध्ये ग्लोबल सिंगर एड शीरन बॉलिवूड गायक अरमान मलिलबरोबर स्टेजवर धमाल करणार आहे. सध्या एड शीरन 2025मधील भारतीय दौऱ्यावर आहे. यापूर्वी त्यानं 30 जानेवारी रोजी पुण्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. त्याचा हा शो अनेकांना आवडला होता. आता तो हैदराबादमध्ये परफॉर्म करण्यास सज्ज आहे. एड शीरन हैदराबादमधील जगातील सर्वात मोठ्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सादरीकरण करत आहे. हॉलिवूड कलाकार 6 शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे. दरम्यान एड शीरन आणि अरमान मलिक परफॉर्म करत असल्यानं चाहत्यांना दुहेरी मेजवानी मिळणार आहे. एड शीरनचा हैदराबादमधील दुसरा म्यूझिक कॉन्सर्ट आहे.
एड शीरनचा शो किती वाजता सुरू होईल? : मिळालेल्या माहितीनुसार अरमान मलिक हा एड शीरनच्या शोचे उद्घाटन करेल. हे सादरीकरण संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. आजची संध्याकाळ एड शीरनच्या चाहत्यांसाठी धमाकेदार असणार आहे, यात शंका नाही. या शोची तिकीट तुम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ऑनलाइन बुक करू शकता, यात ₹ 5000,₹ 9500 आणि ₹ 26,000चा स्लॉट उपलब्ध आहेत. एका वापरकर्त्याला एका वेळी 6 तिकिटे बुक करता येतील. रामोजी फिल्म सिटीच्या बाहुबली सेटवर हा कार्यक्रम होईल.
एड शीरनचा भारतीय म्यूझिक कॉन्सर्टचे वेळापत्रक
30 जानेवारी: यश लॉन्स, पुणे
2 फेब्रुवारी: रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे
5 फेब्रुवारी: चेन्नईतील वायएमसीए ग्राउंडवर
8 फेब्रुवारी: नाईस ग्राउंड्स, बेंगळुरू येथे
12 फेब्रुवारी: जेएन स्टेडियम, शिलाँग
15 फेब्रुवारी: वेजर व्हॅली ग्राउंड, दिल्ली एनसीआर येथे
एड शीरनचा शेवटचा कॉन्सर्ट कुठे होईल : एड शीरनचा 2024मधील मुंबईतील म्यूझिक कॉन्सर्ट खूप जबरदस्त होता. यानंतर त्यानं पुन्हा त्याच्या भारत दौऱ्याची घोषणा केली. आता देखील त्याचे भारतीय चाहते त्याच्या कॉन्सर्टची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हैदराबादनंतर, एड शीरन 5 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये परफॉर्मन्स करेल. तसेच त्याचा शेवटचा भारतीय म्यूझिक कॉन्सर्ट 15 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये होणार आहे.
हेही वाचा :