मुंबई IND vs ENG 5th T20I Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा T20 सामना आज म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियानं पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏#TeamIndia held their composure & sealed a 1⃣5⃣-run victory in the 4th T20I to bag the series, with a game to spare! 🙌 🙌
— BCCI (@BCCI) January 31, 2025
Scorecard ▶️ https://t.co/pUkyQwxOA3 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Jjz5Cem2US
चौथ्या सामन्यात काय झालं : चौथ्या T20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडियानं प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 181 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 182 धावा करायच्या होत्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला आणि 19.4 षटकांत फक्त 166 धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
सलग 17 मालिकांमध्ये विजय : इंग्लंडविरुद्धची T20 मालिका जिंकून टीम इंडियानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असं करणारा टीम इंडिया पहिला देश बनला आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांच्या नावावर कधीच नोंदवला गेला नाही. खरं तर, टीम इंडियानं घरच्या मैदानावर सलग 17 T20 मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम करुन एक नवा इतिहास रचला आहे.
We fall just short in the chase, as India claim victory.
— England Cricket (@englandcricket) January 31, 2025
Congratulations to the hosts, who take an unassailable 3-1 lead in the series.
We will look to bounce back in the final match of the series in Mumbai on Sunday 👊 pic.twitter.com/c2Esp2HZbc
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : आतापर्यंत, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये चांगली स्पर्धा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यात टीम इंडियानं 16 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघानं 12 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या 224 धावांची आहे, जी टीम इंडियानं 2021 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर केली होती. सर्वात कमी संघ धावसंख्या 165 धावा आहे.
वानखेडेवर भारताचा रेकॉर्ड कसा : टीम इंडियानं 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवर पहिला T20 सामना खेळला होता. टीम इंडियानं आतापर्यंत या मैदानावर एकूण पाच T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियानं तीन सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर टीम इंडियाचा सर्वोत्तम स्कोअर 240 धावा आहे.
खेळपट्टी कशी असेल : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा T20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी योग्य आहे. येथील खेळपट्टी लाल मातीपासून बनलेली आहे. या खेळपट्टीवर चांगला उसळी आहे आणि चेंडू बॅटवर सहज येतो. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या खेळपट्टीवर गवत नाही, त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही फार कमी मदत मिळते. या मैदानावर नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.
Three quick wickets swings the momentum in India's favour.
— England Cricket (@englandcricket) January 31, 2025
With four overs to go...
4⃣5⃣ runs to win
2⃣4⃣ balls remaining
3⃣ wickets in hand pic.twitter.com/NxJcl5s18q
भारत विरुद्ध इंग्लंड T20I मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20I सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता (भारत 7 विकेटनं विजयी)
- दुसरा T20I सामना : 25 जानेवारी, चेन्नई (भारत 2 विकेटनं विजयी)
- तिसरा T20I सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट (इंग्लंड 26 धावांनी विजयी)
- चोथा T20I सामना : 31 जानेवारी 2025, पुणे (भारत 15 धावांनी विजयी)
- पाचवा T20I सामना : आज, मुंबई (वानखेडे)
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा T20 सामना 02 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपित केली जाईल. क्रिकेट प्रेमी हे रोमांचक सामने त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, डिजिटल प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल. तसंच डीडी स्पोर्ट्सला भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेचे प्रसारण हक्क मिळाले आहेत, ज्याचं थेट प्रक्षेपण फक्त डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल.
Brutal from Brooky 💪
— England Cricket (@englandcricket) January 31, 2025
Harry Brook brings up his half-century from just 25 balls as this game stays in the balance 🙌
Keep going lads! 👊 pic.twitter.com/hWiS2bxGvw
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
- भारत : संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
- इंग्लंड : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
हेही वाचा :