हैदराबाद Travel tips : मित्रांसोबत सहलीला जाणे हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय क्षण असतो. तुम्ही वीकेंडला मित्रांसोबत ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सहलीची तयारी करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्यापूर्वी तुम्ही काय काळजी घ्यावी, सोबत कोणतं साहित्य घ्यावं इत्यादीबाबत आज जाणून घेऊया...
कारची तपासणी करा : तुमची कार सहलीचा कणा असणार आहे, त्यामुळं ती चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करणं आवश्यक आहे. सहलीच्या काही दिवस आधी, तपासणीसाठी तुमची कार मेकॅनिककडं घेऊन जावी. कारच्या टायरमध्ये पुरेशा प्रमाणात हवा असल्याची खात्री करावी. तसंच सहलीला जाताना सुटे टायर बदलण्यासाठी लागणारी साधनं सोबत घ्यावी. कारमध्ये इंधन, कूलंट, ब्रेक फ्लुइड, विंडशील्ड वॉशर फ्लुइडचं प्रमाण पुरेसं असल्याची खात्री करा. अनपेक्षित घटना टाळण्यासाठी बॅटरी तपासावी. कारची चाक आवज करत असल्यास ब्रेकची चाचणी घ्या. सर्व हेडलाइट्स, टेल लाइट्स, टर्न सिग्नल योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करा. त्यानंतरच तुम्ही सहलीला निघण्याचा प्रयत्न करावा.
पॅक स्मार्ट : चांगल्या सहलीसाठी योग्य वस्तू पॅक करणं तितकच महत्वाचं आहे. आपल्याला आवश्यक गोष्टी कव्हर करण्यात मदत करण्यासाठी खालील चेकलिस्ट पहा. तुमचा मोबाईल, सैंदर्य प्रसाधन, सनस्क्रीन, सनग्लासेस, चार्जरसह सोबत घेतल्याची खात्री करा. कारमध्ये प्रथमोपचार किट, जम्पर केबल्स, टॉर्च, टायर दुरुस्तीची साधनं आणि अतिरिक्त फोन चार्जर यासारख्या वस्तूंसह कार आपत्कालीन किट पॅक करा.
कम्फर्ट आयटम्स : ब्लँकेट, डोक्याखाली घेण्याच्या उशा, हेडफोन्स लाँग ड्राईव्ह दरम्यान प्रत्येकाला आरामात राहण्यास मदत करू शकतात. पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्स सोबत घेतल्यास भूक कमी लागेल.
मनोरंजन : कारुचा लांब प्रवास कंटाळवाणा होऊ शकतो, म्हणून मनोरंजन करण्याची योजना तयार करा. प्रत्येकाच्या आवडत्या ट्यूनसह प्लेलिस्ट तयार करा, पॉडकास्ट किंवा ऑडिओबुक डाउनलोड करा. तुमच्याकडं स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन असल्यास, विश्रांतीच्या स्टॉप दरम्यान ऑफलाइन पाहण्यासाठी चित्रपट किंवा शो आगाऊ डाउनलोड करा.
मार्ग, थांब्यांचं नियोजन करा : त्स्फूर्तता हा रस्त्याच्या सहलीच्या आनंदाचा भाग आहे, परंतु तरीही तुम्हाला रस्तयाची कल्पना असायला हवी. तुमचा प्रवास चांगला होण्यासाठी जीपीएस नेव्हिगेशनचा वापर करा. अन्न, विश्रांती किंवा प्रेक्षणीय स्थळांच्या मार्गावर थांबे घ्या. Google नकाशे सारखे ॲप्स तुम्हाला ट्राफिक टाळण्यात तसंच चागंली पर्यटनस्थळं शोधण्यात मदत करू शकतात. खाण्यासाठी आणि इंधन भरण्यासाठी दर काही तासांनी ब्रेक घेणं देखील आवश्यक आहे. कारण प्रवास सतत केल्यास सहलीचा आनंद घेता येणार नाही, म्हणून विश्रांतीसाठी थोडा वेळ द्या.
जबाबदाराची विभागणी करा : गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला भूमिका जबाबदारी द्या. उदाहरणार्थ, एक व्यक्ती नेव्हिगेशनची जबाबदारी द्यावी. तसंच दुसऱ्याकडं प्लेलिस्ट किंवा मनोरंजनाची जबाबदारी द्यावी. तिसऱ्याकडं स्नॅक्स तसंच जेवणाची जबाबदारी द्यावी. जबाबदाऱ्यांचं विभाजन केल्यानं प्रत्येकजणाला सहलीचा आनंद घेता येईल.
बजेट सेट करा : सहलीपूर्वी आर्थिक चर्चा केल्यानं रस्त्यावरील डोकेदुखी वाचू शकते. गॅस, भोजन आणि निवासासाठी खर्च कसा विभाजित करायचा, ते ठरवा. टोल, पार्किंग शुल्क आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित खर्चाचा हिशेब ठेवण्यास विसरू नका.