ETV Bharat / state

अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; म्हणाल्या, "धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची..." - ANJALI DAMANIA MET AJIT PAWAR

संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं.

ANJALI DAMANIA MET AJIT PAWAR
अंजली दमानिया (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2025, 9:38 PM IST

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांनी ही भेट घेतली. बीडमधील दहशत, पोलिसांची बेबंदशाही व मंत्री धनंजय मुंडेंविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पवारांकडे केली.

पोलिसांवर कोणाचा दबाव? : १३ ऑगस्ट २०२४ रोजी सौरभ भोंडवे या तरुणाला बुडवून मारल्याचा आरोप दमानिया यांनी केला. भोंडवे कुटुंबियांची तक्रार का घेतली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकांनी ही तक्रार नोंदवली नाही, त्यामागे कुणाचा दबाव होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केदार यांना वाल्मिक कराडचा फोन आला होता, असा आरोप भोंडवेंच्या वडिलांनी केल्याची माहिती दमानिया यांनी दिली.

अजित पवारांना पुरावे दाखवले : राजेश पाटील, प्रशांत महाजन, अनमोल केदार यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सगळे पुरावे घेऊन मी अजित पवारांना भेटायला गेले होते. अनेक बाबींची नसलेली माहिती त्यांना दिली. महा जनकोकडून मुंडे, कराड यांच्या कंपन्यांना कसा नफा मिळतोय, हे त्यांना सांगितलं आहे. आमदार व मंत्र्यांबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबत त्यांना स्मरण करुन दिलं. बीडमधील व्यवहारांमध्ये मुंडे व कराड यांना थेट आर्थिक लाभ होत असल्याचं त्यामध्यं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळं त्यांनी आता कारवाई करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली.

मुंडेंचा राजीनामा घ्यायचा विचार करतील : बीडमध्ये जी दहशत पसरवली आहे, त्याचे फोटो, रील्स मी त्यांना दाखवले. त्यांनी ते फोटो बघितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची मंगळवारी दुपारी १२ वाजता बैठक आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती दमानिया यांनी दिली. आपण दिलेली माहिती त्यांनी गंभीरपणे पाहिली व समजावून घेतली आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नक्कीच विचार करतील, असे आपल्याला वाटत असल्याचं दमानिया म्हणाल्या. मात्र, कारवाई झाली नाही तर, ते योग्य ठरणार नाही, असं त्या म्हणाल्या. कारवाई झाली नाही तर, मुख्य न्यायमूर्तींकडे स्युमोटो कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोगानं मनावर घेतलं तर मुंडे यांचं मंत्रीपदच नाही तर, त्यांची आमदारकी देखील जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्या प्रकरण : आरोपींना ऑर्थर रोड किंवा येरवडा तुरुंगात पाठवा, अंजली दमानियांची मागणी
  2. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण. .: अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
  3. "संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीचे ऑडिओ व्हिडिओ चित्रीकरण करा", अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.