प्रयागराज - बारा वर्षांतून एकदा येणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानं सुरुवातीला १० जणांचा मृत्यू झाला. आता हा आकडा वाढून ३० झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण चेंगराचेंगरीत जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्तानं संगम तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अचानक चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. घटनास्थळी विखुरलेले बूट, चप्पल आणि कपडे दिसून आले आहेत.
महाकुंभ मेळाव्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी सांगितलं, "अफवेमुळे संगमावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना महाकुंभनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींना महाकुंभ रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांची लांब रांग आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतलं आहे."
- दुर्घटनेनंतर भाविकांचे मृतदेह काही तास घटनास्थळीच पडून होते. अनेक जण आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना शोधत आहेत. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत दुर्घटनेची माहिती घेतली.
#WATCH प्रयागराज: भाजपा सांसद हेमा मालिनी ने मौनी अमावस्या के अवसर पर महाकुंभ में पहुंचकर पावन स्नान किया। उन्होंने कहा, " महा स्नान के शुभ अवसर पर मुझे यहां पावन स्नान करने का अवसर मिला। ये मेरा सौभाग्य है। बहुत अच्छा लगा। करोड़ों लोग आए हुए हैं।" pic.twitter.com/fEdvxFNvcn
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2025
दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " प्रयागराजमध्ये आज सुमारे ८-१० कोटी भाविक उपस्थित आहेत. आखाडा मार्गावरील बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काल रात्री मौनी अमावस्येचा मुहूर्त सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येनं भाविक महाकुंभ मेळाव्यात येत आहेत. पंतप्रधानांनी चार वेळा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यपाल आनंदीबेन पटेलदेखील परिस्थितीची सतत माहिती घेत आहेत. प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु गर्दी खूप जास्त आहे. संपूर्ण कुंभ परिसरात घाट बांधण्यात आले आहेत. भाविकांना फक्त संगमाकडं जाण्याची गरज नाही. रेल्वेने प्रयागराज प्रदेशातील वेगवेगळ्या स्थानकांवरून भाविकांना त्यांच्या स्थळी परत नेण्यासाठी विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे."
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने की श्रद्धालुओं से अपील -
— Yogi Adityanath Office (@myogioffice) January 29, 2025
माँ गंगा के जिस घाट के जो समीप है, वहीं स्नान करें, संगम नोज की ओर जाने का प्रयास न करें।
प्रशासन के निर्देशों का अनुपालन करें, व्यवस्था बनाने में सहयोग करें।
किसी भी अफवाह पर ध्यान न दें।
भाविकांना महाकुंभ मेळाव्यात येण्यास मनाई- चेंगराचेंगरीबाबत माहिती देताना कुंभमेळा प्राधिकरणाच्या विशेष कार्यकारी अधिकारी आकांक्षा राणा म्हणाल्या," संगमावर बॅरिकेड्स तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणीही गंभीर नाही." अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी आजचे शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरिता संगम किनाऱ्यावर एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाविकांना संगमावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना महाकुंभात येण्यापासून रोखण्यात येत आहे.
#WATCH | #MahaKumbh2025 | Prayagraj, Uttar Pradesh: President of Akhil Bharatiya Akhara Parishad, Ravindra Puri says, " we are saddened by the incident that took place. there were thousands of devotees with us... in the public interest, we decided that the akharas will not… pic.twitter.com/3HHkYjG11G
— ANI (@ANI) January 29, 2025
- गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाविकांना आवाहन महाकुंभ मेळाव्यात शाही अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. " नजीकच्या गंगामातेच्या घाटावर स्नान करा. संगमावर जाण्याचा प्रयत्न करू नका. आंघोळीसाठी अनेक स्नानघाट बांधण्यात आले आहेत. तिथे अंघोळ करता येते. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. व्यवस्थेसाठी सहकार्य करा. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका.
हेही वाचा-