हैदराबाद Upcoming Mobile Phones in Feb 2025 : जानेवारी २०२५ मध्ये भारतीय बाजारात अनेक नविन स्मार्टफोन लाँच झाले आहेत.आता फेब्रुवारी महिना देखील स्मार्टफोन लॉंचसाठी खास असेल. कारण या महिन्यात उत्तम फीचरसह मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन लॉंच होणार आहेत. त्यामुळंच आज आपण फेब्रुवारीमध्ये लाँच होणाऱ्या या आगामी फोन्सची माहिती जाणून घेऊया...
Samsung Galaxy S25 Edge
सॅमसंगने गॅलेक्सी अनपॅक्ड २०२५ इव्हेंटमध्ये सॅमसंगनं गॅलेक्सी एस२५ एजचा टीझर देखील रिलीज केला होता. या टीझरद्वारे कंपनीनं पुष्टी केली आहे, की Galaxy S25 Edge या वर्षीच लाँच होईल. कंपनीनं या फोनबद्दल अधिक माहिती दिली नाही, परंतु अशी चर्चा आहे की कदाचित हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या अखेरीस बाजारात आणला जाऊ शकतो. अद्याप याची पुष्टी झालेली नाही, परंतु MWC म्हणजेच मोबाइल वर्ल्ड काँग्रेस सुरू होण्यापूर्वी सॅमसंग त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन शेअर करू शकते. हा स्मार्टफोन ५० ते ६० हजार रुपयांच्या रेंजमध्ये आणला जाऊ शकतो.
Xiaomi १५
Xiaomi १५ हा जगातील पहिला मोबाईल फोन आहे, जो स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसरसह आला होता. हा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता भारतात त्याची लॉंच होण्याची शक्यता आहे. त्याच मालिकेतील Xiaomi १५ Ultra मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2025 मध्ये जागतिक स्तरावर सादर केला जाईल. त्याचवेळी कंपनी भारतात Xiaomi १५ सादर करू शकते. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन ३२MP फ्रंट कॅमेरा आणि ५०MP + ५०MP + ५०MP बॅक कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, यात ५,४००mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये ९०W वायर्ड आणि ५०W वायरलेस चार्जिंग आहे. Xiaomi १५ ६.३६-इंच १२०Hz OLED डिस्प्लेला सपोर्ट करतो.
iQOO Neo 10R
iQOO Neo 10R हा मध्यम बजेट सेगमेंटमध्ये भारतात देखील लाँच केला जाऊ शकतो. हा एक मोठी बॅटरी असलेला फोन असेल, जो भारतात ६,400 mAh बॅटरीसह सादर केला जाईल अशी चर्चा आहे. त्याच वेळी, या मजबूत बॅटरीला चार्ज करण्यासाठी फोनमध्ये ८०W फास्ट चार्जिंग मिळू शकते. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८s Gen ३ प्रोसेसरसह आणला जाऊ शकतो, ज्यामध्ये १२GB रॅम अपेक्षित आहे. मोबाईलमध्ये ६.७८-इंच १४४Hz AMOLED स्क्रीन दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, यात ५०MP ड्युअल रियर कॅमेरा आणि १६MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
realme P३ Pro
हा कमी बजेटचा Realme फोन फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केला जाईल. Realme P३ Pro ५G फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ Gen ३ प्रोसेसरसह आणला जाऊ शकतो, ज्यामध्ये १२GB रॅम असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये ५,५००mAh बॅटरी असू शकते ज्यामध्ये ८०W SUPERVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळू शकतं. काही लीक्समध्ये Realme P३ Pro ५०MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल, असा दावा करण्यात आला आहे. त्याच वेळी, बॅक पॅनलवर ५०MP आणि ३२MP सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये ६.७८-इंच १२०Hz AMOLED डिस्प्ले असू शकतो.
Vivo V५०
Vivo V५० नविन स्मार्टफोन भारतात १८ फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची शक्यात आहे. त्यासोबत Vivo V50 Pro देखील लाँच होण्याची अपेक्षा आहे. लीकवर विश्वास ठेवायचा झाला तर, Vivo V५० ५G फोन १२ जीबी रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेटवर काम करेल. पॉवर बॅकअपसाठी, त्यात ६,००० एमएएच बॅटरी आणि चार्जिंगसाठी ९० वॉटचं चार्जर दिलं जाऊ शकतं. फोटोग्राफीसाठी, Vivo V50 हा 50MP सेल्फी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो, ज्याच्या मागील बाजूस दोन 50-मेगापिक्सेल सेन्सर देखील मिळू शकतात. या फोनमध्ये ६.६७ -इंचाचा FHD +१२०Hz AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Infinix Note ५०
पुढील महिन्यात Infinix Note ५० मालिका भारतात लाँच केली जाऊ शकते, ज्यामध्ये Infinix Note ५०आणि Note ५०X लॉंच होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही फोनबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही, परंतु Infinix Note ५० ची किंमत १५ हजार ते २० हजार दरम्यान असू शकते,असा अंदाज आहे. Infinix Note ५०X ची किंमत १२हजार ते १५ हजार दरम्यान असू शकते. हा स्मार्टफोन ८GB रॅमसह लॉं होऊ शकतो. यात MediaTek Dimensity प्रोसेसर दिलं जाण्याची अपेक्षा आहे. दोन्ही फोनमध्ये ६.५ इंचापेक्षा मोठी स्क्रीन आणि मोठी बॅटरी असू शकते.
Tecno Pova Curve ५G
Tecno चा नवीन फोन फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केला जाईल. अद्याप याची पुष्टी झालेली नाही, परंतु या मोबाईलचं नाव Pova Curve ५G असेल, असं सांगितलं जातंय. नावाप्रमाणेच, हा एक वक्र स्क्रीन असलेला फोन असेल ज्यामध्ये गोल कडा आढळू शकतात. फोन डिस्प्लेवर १२०Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. Tecno Pova Curve ५G फोनची किंमत देखील १५ हजार ते २० हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकते. या मोबाईलमध्ये ८ जीबी रॅमसह मीडियाटेक मोबाईल चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे.
हे वाचंलत का :