ETV Bharat / state

'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारा'च्या नावानं घोटाळा उघडकीस, दोघांवर गुन्हा दाखल - DADASAHEB PHALKE AWARD

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या नावाने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात अनिल मिश्रा आणि अभिषेक मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Fake Dadasaheb Phalke International Award
दादासाहेब फाळके पुरस्कार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 10:32 PM IST

Updated : Feb 7, 2025, 2:37 PM IST

मुंबई : मनोरंजन क्षेत्राची राजधानी म्हणूनही मुंबईची ओळख आहे. ही राजधानी एका नव्या स्कॅमने हादरली असून याचा फटका सिनेसृष्टीतील अनेकांना बसला आहे. हे स्कॅम आहे दादासाहेब फाळके पुरस्काराचं. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नावाने एक संस्था सुरू करण्यात आली. त्याद्वारे हा पुरस्कार देण्याची आम‍िष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या ८ वर्षांपासून हा बोगस पुरस्कार अनेक दिग्गजांना देण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थायकीय संचालक अनिल मिश्रा आणि त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या एका जोडप्यासाठी तिकीटाची किंमत २.५० लाख रुपये ठेवण्यात आली असून ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तिकीट विक्री करण्यात येत आहे. ही बोगस विक्री करून जनतेची तसेच सरकारची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर आहे.

काय आहे प्रकरण? : १९ आण‍ि २० फेब्रुवारी २०२५ रोजी वांद्र पश्च‍िम येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एण्डस येथे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार या नावाने एक सोहळा आयोजित करण्यात आल्याची माह‍िती प्रसिद्ध करण्यात आली होती. अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी पार्वती मिश्रा हे या आयोजक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीने ३० मे २०२४ रोजी वांद्रे पोलीस ठाण्याकडून परवानगी घेतली होती. तर वांद्रे पूर्व येथील विद्यूत निरिक्षक कार्यालयाकडूनही परवानगी २७ मे २०२४ रोजी परवानगी घेण्यात आली होती. याशिवाय वांद्रे वाहतूक विभागाकडून २७ मे २०२४ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र तर, रंगभूमी प्रयोग पर‍िनिरिक्षक मंडळाकडूनही १० जून २०२४ रोजी परवानी घेण्यात आली होती. त्यानंतर मिश्रा यांनी पुरस्कार सोहळ्याचे इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिद्धी सुरू केली होती. मिश्रा यांनी अनेक व्यक्तींकडून तसेच मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्वाच्या नावाने मोठी रक्कम घेतली आहे, असा आरोप यासंदर्भात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात मिश्रा यांचा मुलगा अभिषेक याचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहे.

समीर दीक्षित यांची प्रतिक्रिया (Source- ETV Bharat)

केंद्रीय मंत्र्याच्या नावाने फसवणूक : भाजपाच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी हा प्रकार लक्षात येताच तपास सुरू केला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी भारत न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) व ३१९ (२) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी समीर दीक्षित यांनी सांगितलं की, "मिश्रा यांनी कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध नेत्यांच्या शुभेच्छा असल्याचं भासविलं. हा पुरस्कार केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती भवनात द‍िला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार असल्याचेही त्यांनी भासविलं. सरकारच्या पुस्काराचं नाव देखील मिश्रा यांनी कॉपी केल्याचा आरोप असून प्रत्यक्षात ट्रेडमार्क नोंदणी कार्यालयानं मिश्रा यांच्या कंपनीचा 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा ट्रेडमार्क फेटाळला आहे. त्याच्या संकेतस्थळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लोकसभाध्यक्ष ओम ब‍िर्ला यांची नावे शुभेच्छूक असल्याचं भासविण्यात आलं".

पंतप्रधानांचं नाव वापरून दिग्गज सेलिब्र‍िटींवर टाकला दबाव : अनिल मिश्रा यांनी आपण माहिती आणि प्रसारण मंत्रालयातून बोलत आहे, असं सांगून अनेक सेलिब्र‍िटींना संपर्क केला. स्वत: पंतप्रधान या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांचं नाव घेऊन त्यांनी अनेक सेलिब्र‍िटींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसंच दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यातील सरकारी अध‍िकाऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न केला.

८ वर्षांपासून सुरू आहे खोट्या पुरस्काराचं वितरण : "हा पुरस्कार सोहळा २०१६ पासून आयोजित करण्यात येत आहे. अनेक दिग्गज सेलिब्र‍िटींना आमिष दाखवून किंवा पंतप्रधान आणि इतर दिग्गज नेत्यांच्या नावाने दबाव टाकून पुरस्कार स्वीकारण्यास बाध्य करण्यात आलं. या दिग्गजांनी हा पुरस्कार स्वीकारला देखील. डिसेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्मयंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात स्वत:ला आयएसएस अधिकारी असल्याचं भासवून अनिल मिश्रा यांनी श‍िरण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्याला याप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती". साधारणत: २० ते २५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक मिश्रा यांनी केल्याचा दावा दीक्षित यांनी केला.

हेही वाचा -

  1. मिथुन चक्रवर्तींचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
  2. ''माझ्याकडे शब्द नाहीत" - दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती झाले भावुक - Dadasaheb phalke award
  3. 'डिस्को डान्सर'च्या अभिनयसामर्थ्याला सर्वोच्च पुरस्काराची दाद, मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर - Dadasaheb Phalke Award

Last Updated : Feb 7, 2025, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.