ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका; म्हणाले, "गणेशमूर्ती विसर्जनबाबत..." - ADITYA THACKERAY ON MAHAYUTI GOVT

गणपतीचं विसर्जन तलावात किंवा समुद्रात विसर्जन करू नया न्यायालयानं निर्णय दिला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

ADITYA THACKERAY ON MAHAYUTI GOVT
आमदार आदित्य ठाकरे (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 10:24 PM IST

मुंबई : माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीची स्थापना गेल्या आठवड्यात करण्यात आली. मात्र, गणेशमूर्तीचं विसर्जन तलावात किंवा समुद्रात करु नये. त्यामुळं पर्यावरणाची हानी तसंच मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होतं. म्हणून पीओपी गणपतीचं तलावात किंवा समुद्रात विर्सजन करू नये, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. मात्र, पीओपी गणपतीचं तलावात आणि समुद्रात विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळ ठाम असून, यावर राज्य सरकारनं कोर्टात गणेश मंडळाची भूमिका मांडावी, असं गणेश मंडळांनी म्हटलं होतं. दरम्यान, याचे पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटताना दिसले.

मुख्यमंत्री शांत का? : "माघी गणेशोत्सव गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले आहेत. तसंच राज्य सरकारनं गणेश मंडळांना कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन करण्याचं म्हटलं आहे. परंतु, पीओपी गणपतीचं विसर्जन तलावात किंवा समुद्रात करू नये. हे मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. यावर कोणताही तोडगा निघाला नाही आहे. यापूर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली होती की, हिंदूचे सण, उत्सव जोरात साजरे केले जातील असं म्हटलं होतं. परंतु आताचे जे मुख्यमंत्री आहेत आणि स्वतःला हिंदूत्वचं सरकार म्हणून घेतात. ते उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत. जे मंडळांना नियम, अटी घातल्या आहेत ते पूर्वी सुद्धा होते. मग आताचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार का शांत बसले आहे?" असा सवाल मनसेचे विभागप्रमुख दिनेश साळवे यांनी उपस्थित केला. त्यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

हे हिंदूविरोधी सरकार : दुसरीकडं गणेशोत्सव आणि मूर्ती विसर्जनावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. एकीकडं राज्य सरकार कोणतीही भूमिका मांडत नसताना दुसरीकडं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पदसाद पाहायला मिळाले. मंत्री आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयाच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धावली घेतली पाहिजे, असं म्हटल्याचं समोर येत आहे. तर शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आदित्य ठाकरेंनी यावरून सरकारला धारेवर धरले आहे. "हे सरकार स्वतःला हिंदू म्हणून घेत आहे. परंतु, हिंदूच्या आणि मराठी माणसाच्या सणावरच हे आडकाठी घालत आहे. भाजप केवळ निवडणुकीसाठी आणि मतांसाठी हिंदुत्व असल्याचं स्वतःला समजतं आणि हिंदूंचा वापर करते. मात्र, वापर झाल्यानंतर फेकून देत. आता हिंदूंच्या सणासाठी कोर्टानं काही निर्बंध घातले आहेत. त्यावर राज्य सरकारनं तोडगा काढणे अपेक्षित होतं. परंतु, यावर सरकार चिडूचूप भूमिका आहे. त्यामुळं हे हिंदू विरोधी सरकार आहे." टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा :

  1. वसई, विरारकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; देहरजी पाटबंधारे प्रकल्पाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय कोणते?
  2. 'व्हॅलेंटाईन डे'ला मावळातील गुलाबाला लय डिमांड! रेड रोझ निघाले परदेशात
  3. "...म्हणून रायगडमधल्या आमदारांना आमंत्रण नाही"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.