ETV Bharat / state

डंकी मार्गाने अमेरिकेत गेलेला तरुण नागपूरला परतला, नागपूर पोलिसांनी केली चौकशी - HARPREET SINGH LALIA

अमेरिकेतून भारतात हद्दपार केलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांमध्ये महाराष्ट्रातील तीन जणांसह नागपूरमधील एका तरुणाचा समावेश आहे. तर नागपूरातील तरुणाची माहिती आता समोर आली आहे.

हरप्रीत सिंह ललिया
हरप्रीत सिंह ललिया (ETV Bharat Reoprter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 10:57 PM IST

नागपूर : नागपुरातून बेकायदेशीर डंकी मार्गाने अमेरिकेत गेलेल्या तरुणाची माहिती आता समोर आली आहे. हरप्रीत सिंह ललिया असं तरुणाच नाव आहे. ३४ वर्षीय हरप्रीत सिंह ललियाचा नागपुर शहरात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. ५ डिसेंबर २४ रोजी हरप्रीत सिंह अबुधाबी मार्गे कॅनडाला जाण्यासाठी दिल्लीतून निघाला होता. हरप्रीत सिंह ललिया याने डंकी मार्गाने कॅनडाला जाण्यासाठी एजंटला दोन टप्प्यांमध्ये सुमारे 50 लाख रुपये दिले होते. पहिल्यांदा अठरा लाख रुपये भारतात देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 31 लाख 50 हजार रुपये घेण्यात आले.

हरप्रीत सिंह ललियाला चौकशीसाठी बोलावले : आज पहाटे नागपूर आल्यानंतर हरप्रीत सिंह ललियाला नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी अमृतसरमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये ही सेंट्रल एजेंसीसने चौकशी केली होती. एजंटच्या माध्यमातून कॅनडाचा विजा काढलेला होता. मात्र, अबुधाबी विमानतळावर हरप्रीतसिंह ललिया थांबवण्यात आले होते. कॅनडाच्या विमानात बसू देण्यात आले नाही. त्यानंतर हरप्रीत सिंहला विमान कंपनीने पुन्हा दिल्लीला पाठवले.

अमेरिकेत गेलेला तरुण नागपूरला परतला (ETV Bharat Reoprter)

असा सुरु झाला अवैध प्रवास : १८ डिसेंबर पर्यंत दिल्लीला थांबल्यानंतर एजेंट ने मुंबईमार्गे आधी इजिप्त त्यानंतर कॅनडाला जाण्याचा नवा मार्ग सुचवला आणि व्यवस्था ही केली. १८ डिसेंबरला हरप्रीत सिंह दिल्लीवरून मुंबईला येऊन इजिप्तला विमानाने पाठवण्यात आले. २२ डिसेंबरपर्यंत इजिप्तला थांबून तिथून हरप्रीत सिंह ललियाला स्पेनची राजधानी मद्रिडला विमानाने पाठवण्यात आले. मेड्रीड स्पेन वरून त्यांचं साहित्य कॅनडाला पाठवलं गेलं, मात्र हरप्रीतसिंह ललियाला विमानाने दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालाला नेण्यात आलं.

१० दिवस माफियांच्या ताब्यात : गवाटेमाला २७ डिसेंबर पर्यंत थांबविले होते. २७ डिसेंबरला ग्वाटेमाला मधून निकारागुवाला येथे विमानाने नेण्यात आले. निकारागुवा मधून बाय कारने हौंडूरासला नेले. तिथून पुन्हा सडक मार्गाने ग्वाटेमालमधील दुसऱ्या निर्जन ठिकाणी आणले गेले. नदी क्रॉस करून मेक्सिकोमध्ये प्रवेश झाला. मेक्सिकोमध्ये मेक्सिकोसिटी नंतर हरमासिलो येथे १० दिवस माफियांच्या ताब्यात राहावे लागले. तिथून सडक मार्गाने पनास्को, मेक्सिकेलीला नेले. यावेळी सतत बंदूकधारी माफी यासोबत होते.

अमेरिकी सुरक्षा दलांकडून अटक : साडे चार तास पायी चालून मेक्सिको अमेरिका बॉर्डर क्रॉस करण्यात आली. अमेरिकेत प्रवेश केल्यानंतरही १६ तास पायी चालल्यानंतर अमेरिकी सुरक्षा दलांकडून अटक झाली. तिथे हातकडी लावण्यात आली होती. त्या तुरुंगात तेरा दिवस ठेवल्यानंतर कॅलिफोर्निया मधील एका अज्ञात ठिकाणी अमेरिकन आर्मीच्या बेसवर आणण्यात आले. तिथून भारतला परत पाठवण्याची प्रक्रिया राबवली. भारतात परत पाठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान विमान काही ठिकाणी थांबलं. मात्र ते कोणते ठिकाण होते याची कुठलीही माहिती नाही. परत आणताना सतत नजरेखाली ठेवण्यात आले मात्र, हातकडी लावण्यात आली नव्हती.

हेही वाचा -

  1. तेलंगाणातील 'या' तरुणानं दोन वर्षांत मिळवल्या सहा सरकारी नोकऱ्या, तरुणांसाठी ठरतोय आशेचा किरण - Inspiring Journey
  2. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan
  3. 'बेपत्ता' झालेला 'तारक मेहता..' फेम गुरुचरण सिंग सापडला, कुटुंबीयांसह प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला - Taarak Mehta Fame Gurucharan Singh

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.