ETV Bharat / state

भर व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवारांनी भाजपा आमदाराला सुनावलं; पाहा व्हिडिओ - AJIT PAWAR ON MAHESH LANDGE

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारतीच्या भूमीपूजनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांना फटकारलं.

Ajit Pawar and Mahesh Landge
अजित पवार आणि महेश लांडगे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 10:05 PM IST

पिंपरी- चिंचवड (पुणे) : चिखली येथे गुरुवारी नवीन पोलीस आयुक्तालय भूमिपूजन समारंभात अजित पवार यांनी भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच खडसावलं. काय झालं नेमकं? वाचा...

माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं? : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून, महेश लांडगे यांना "माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं? हे मला माहित नाही. मात्र ज्यानी चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका" असं म्हणत आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन चिखली येथील प्रस्तावित जागेत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्य मंत्री योगेश कदम तसंच महायुतीचे आमदार उपस्थित होते.

सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reoprter)

...यामुळं वादाची ठिणगी : आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवनेरी जिल्हा तयार करण्याची जाहीर मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री पवारांनी जिल्हा विभाजनाला स्पष्ट नकार दिला. पोलीस आयुक्तालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आमदार महेश लांडगे यांनी शहरभर ‘ब्रँडिंग’ केलं आणि भाजपानं श्रेय घेतलं. यावरुन वादाची ठिणगी पडली. महेश लांडगे यांनी शहरात भाजपाची जाहीरातबाजी केली. होर्डिंग आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या. या जाहिरातींमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींचे फोटो झळकले. महायुतीचे सरकार असताना आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाहिरातींमध्ये दिसला नाही. ही बाब अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळं सकाळपासूनच अजितदादांचा पारा चढला होता, असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं.

काय म्हणाले महेश लांडगे? : "पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल, तर शिवनेरी जिल्हा करा. पिंपरी-चिंचवडचा विकास 2014 नंतर युतीच्या काळात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर आहे," असं महेश लांडगे म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार? : "जिल्ह्यांचं विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. जिल्हा विभाजन करणार नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केला. महेश लांडगे नाव घ्यायला का विसरले माहिती नाही. काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजुसपणा करू नका, मीसुद्धा 1992 पासून पिंपरी-चिंचवडचा विकास केला," असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी; अजित पवारांनी केलं अर्थसंकल्पाचं स्वागत
  2. लहानपणी राजकीय हस्तक्षेप होत होते; अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग; अजित पवारांचं वक्तव्य
  3. कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावणार-अजित पवारांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.