ETV Bharat / state

कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावणार-अजित पवारांचा इशारा - AJIT PAWAR BEED VISIT

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदा बीड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांनी चुकीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

Ajit Pawar Beed visit
अजित पवार बीड दौरा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 11:43 AM IST

बीड- "येथे बाहेरचे गुंतवणूक करायला उद्योजक येतात. त्यांना जर कोणी खंडणी मागितली तर त्यांची गया केली जाणार नाही. जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावायला मागे-पुढे पाहणार नाही," असा इशारा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

बीडचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, "तुम्ही चुकीचे काम केले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीनं कामे केली जातील. कुणी या ठिकाणी रिवॉल्व्हर लावून फिरत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. रिवॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीचं लायसन कॅन्सल करण्यात येणार आहे. प्रत्येकानं आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा. चारित्र्य स्वच्छ ठेवा. कोणी पोलीस कर्मचारी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. पंचवीस-पंधराची कामे किंवा इतर निधी वाटायला मी आलेलो नाही."

कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये- "बीड जिल्ह्यात झालेल्या कामाची मी पाहणी करणार आहे. कुठलाही अधिकारी, कर्मचारी किंवा गुत्तेदार चुकीचं काम केले तर त्याची गय केली जाणार नाही," असा सज्जड दम बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीला गेल्यानं त्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी राजकीय चर्चा होती. त्यावर बीडचे पालकमंत्री पवार म्हणाले," ते (धनंजय मुंडे) एका खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे दिल्लीला गेले होते. कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये," असे सांगत अजित पवारांनी धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले.

अजित पवारांनी स्वत:कडं घेतलं पालकमंत्रिपद- गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची राज्यभरात चर्चा आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आठ आरोपींपैकी सात आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलेले आहेत. मात्र, कृष्णा आंधळे आरोपी अजूनही फरार आहे. वाल्मिक कराडवर कारवाई करावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा, यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलकांनी केली. आरोपी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यानं धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: बीडचे पालकमंत्री पद घेतलं आहे.

हेही वाचा-

  1. राजीनामा न देण्यावर धनंजय मुंडे ठाम, चेंडू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला, तर सुप्रिया सुळेंचे भेदक सवाल
  2. "राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री..."; मंत्री धनंजय मुंडेंनी थेटच सांगितलं
  3. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.