ETV Bharat / health-and-lifestyle

मध्यरात्री जाग आल्यावर झोप येत नाही? फॉलो करा तज्ञांनी दिलेल्या 'या' टिप्स निद्रानाश होईल दूर - HOW TO SLEEP AFTER SLEEPLESS NIGHT

अनेकांना मध्यरात्री जाग आल्यावर कितीही प्रयत्न केलं तरी काही केल्या झोप लागत नाही. अशा वेळी तुम्ही तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास झोपेची समस्या दूर होईल.

HOW TO SLEEP AFTER SLEEPLESS NIGHT  SLEEPLESS NIGHT CAUSE PROBLEMS  HOW I GET SLEEP IN MIDNIGHT  HOW TO GET RID OF INSOMNIA
निद्रानाशाच्या सस्येनं त्रस्त आहेत (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Jan 29, 2025, 7:46 AM IST

How To Sleep After Sleepless Night: हल्ली काही लोक निद्रानाशाच्या सस्येनं त्रस्त आहेत. अचानक मध्यरात्री जाग येते आणि कितीही प्रयत्न केले तरी झोप येणं कठीण होते. यामुळे तणाव, चिडचिड आणि निद्रानाशाचा त्रास होतो. तंसचं रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे कामात लक्ष केंद्रित करता येत नाही. त्याचबरोबर दिवसभर फ्रेश देखील वाटत नाही. जर तुम्ही देखील निद्रानाशाच्या समस्येनं त्रस्त असाल तर तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स फॉलो करा. यामुळे तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत होते.

  • बेडरुमचे लाइट मंद करा: काही लोकांना बेडरूममधील सर्व लाइट बंद केल्यावरच झोप येते. नीट झोपण्याची सवय लागण्यासाठी तुम्हाला तुमच्या बेडरूममधील प्रकाश शक्य तितका कमी करावा लागेल. परिणामी, तुम्हाला सहज झोप येईल आणि मध्यरात्री कमी वेळा जाग येईल, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • घड्याळाकडे पाहू नका: जर तुम्ही मध्यरात्री उठलात तर घड्याळाकडे न पाहता परत झोपा. जर तुम्ही सतत घड्याळात वेळ बघत असाल तर तुमच्यावर ताण येण्याची शक्यता असते. तज्ञांच्या मते, अशावेळी तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि कोणताही विचार न करता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्या आवडत्या दिनचर्येत व्यस्त रहा: काही लोकांना गाणी ऐकणे आणि झोपण्यापूर्वी पुस्तके वाचयला आवडते. जर तुम्ही मध्यरात्री उठला आणि कितीही प्रयत्न करूनही झोप येत नसेल तर दुसऱ्या खोलीत जा आणि तुम्हाला आवडत असलेली गाणी ऐका किंवा एखादं पुस्तक वाचा. अशाप्रकारे सराव केल्याने तुम्हाला पुन्हा झोप येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • चांगले अन्न आवश्यक: तुम्ही रात्री जे अन्न खाता ते झोपेसाठीही महत्त्वाचे असते. सहज पचणारे अन्न रात्री खाणं उत्तम. काहीजण डायटिंगच्या नावाखाली खाणें सोडून देतात. तर काही लोक खूप कमी अन्न खातात. अशा लोकांना नीट झोप येत नाही. त्यांना मध्यरात्री भूक लागते. यामुळे ते दुसऱ्या दिवशी थकलेले दिसतात. त्यासाठी तज्ञ रात्री झोपण्यापूर्वी चांगले जेवण घेण्याचा सल्ला देतात. 2013 मध्ये स्लीप मेडिसिन रिव्ह्यूज या जर्नलमध्ये 'द इफेक्ट्स ऑफ कॅफीन ऑन स्लीप' (झोपेवर कॅफिनचे परिणाम) अभ्यासात असं आढळून आलं की, कॉफी पिल्याने झोप नीट होत नाही.
  • दिवसभरात तासनतास झोपू नका: काहीजण घरीच राहतात आणि दुपारच्या जेवणानंतर 2 ते 3 तास आरामात झोपतात. जर तुम्ही दुपारी आरामात झोपलात तर तुम्हाला रात्री झोप लागणार नाही. दिवसभरात तासनतास झोपणं चांगलं नाही. तज्ञांनी असं सुचवलं की, जर तुम्हाला दुपारी झोपायचं असेल तर एक चतुर्थांश किंवा अर्धा तास झोप घेणं चांगलं.
  • हे चित्रपट पाहू नका: काही लोकांना हॉरर चित्रपट पाहण्यात जास्त रस असतो. हे चित्रपट पाहताना तुम्हाला आनंद होतो. मात्र, झोपायला गेल्यावर त्या चित्रपटातील काही भितीदायक दृश्ये आठवतात. यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही. झोपण्यापूर्वी अशा प्रकारचे चित्रपट पाहणे शक्यतो टाळणे चांगले. तुम्हाला चित्रपट पहावेसे वाटत असल्यास, मनाला शांती आणि आनंद देणारे चित्रपट पाहणे चांगले आहे, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7907384/

हेही वाचा

  1. रात्री झोप येत नाही? या ७ गोष्टी आजच आत्मसात करा
  2. चांगली झोप येण्यासाठी 'भूमध्यसागरीय आहार' फायेदशीर! - Mediterranean Diet
  3. वयानुसार दररोज कितीवेळ झोप गरजेची, झोपण्याची आणि उठण्याची सर्वोत्तम वेळ काय? - Right Time To Sleep And Wake Up
  4. कामाच्या वेळी येणाऱ्या झोपेनं परेशान आहात? ट्राय करा हा 'फंडा' - How To Stop Falling Asleep At Work

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.