ETV Bharat / state

"लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू" - MINISTER AKASH FUNDKAR

चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.

Akash Fundkar
सिने टी व्ही असोशिएशननं घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 10:07 PM IST

मुंबई : चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना काही त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यासोबत अन्याय होत आहे. कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या काही तक्रारी कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांच्याकडे आल्या होत्या. त्याची फुंडकर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायाधिकरण स्थापण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे त्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिने टी व्ही असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी आज मंत्रालयात कामगार मंत्री फुंडकर यांची भेट घेतली. चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा त्यांनी कामगार मंत्र्यांसमोर मांडला. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही : राज्यातील लहान कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फुंडकर म्हणाले.

वेळेत वेतन मिळावे यासाठी पुढाकार : लहान कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी मसुदा तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.