ETV Bharat / state

नवजात मुलीचा सौदा, आई-वडिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल - NEWBORN GIRL DEAL

सहा दिवसाच्या नवजात 'नकोशी'ची 90 हजार रुपयात शासकीय रुग्णालयाच्या दारात सौदेबाजी होत होती. ही सौदेबाजी करणाऱ्या पालकांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.

NEWBORN GIRL DEAL
नवजात बाळ (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 9:26 PM IST

Updated : Jan 29, 2025, 10:32 PM IST

ठाणे : सहा दिवसाच्या नवजात 'नकोशी'ची 90 हजार रुपयांत शासकीय रुग्णालयाच्या दारात सौदेबाजी करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात असलेल्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या आवारात घडली.

नकोशीच्या आई-वडिलांकडून सौदा : खळबळजनक बाब म्हणजे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचं कारण पुढं करत 'नकोशी'च्या आई वडिलांनीच सौदेबाजी केल्याचं समोर आलं. आता ह्या प्रकरणी नवजात 'नकोशी'च्या आजीच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थ महिला आणि खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी तीन पुरुषांना अटक केली आहे. तर, तीन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.

आजीनं केली तक्रार : मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या मराठा सेक्शन परिसरात तक्रारदार विजया गायकवाड ह्या राहतात. त्यांना दोन मुलं असून त्यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे. विशालला 22 जानेवारीला उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात मुलगी झाली होती. विशालची आई 25 जानेवारीला नवजात बाळाला (मुलगी) बघण्यासाठी रुग्णालयात आली असता नवजात बालिकेची 90 हजार रुपयांना विक्री झाल्याचं आरोपी मुलानं सांगितलं. मात्र, पुन्हा ती वनजात बालिका मिळविण्यासाठी नवजात बालिकेच्या आजी विजया यांनी प्रयत्न करत सौदेबाजी करून घेतलेले पैसे पुन्हा परत करून बाळाला आण असं विशालला सांगितलं.

माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे (ETV Bharat Reporter)

पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल : नवजात बालिकेला आरोपीनं, मध्यस्थ महिलांच्या प्रयत्नानं शेख कुटुंबीयांना विक्री केल्याचं पोलिसांनी सांगितलं. विशेष म्हणजे बालिकेचा सौदा करणाऱ्या शेख पती पत्नीला गेल्या 18 वर्षापासून बाळं झालं नसल्यानं त्यांनी या बालिकेचा सौदा केला होता. अखेर आजीच्या तक्रारीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थ 2 महिला आणि खरेदी करणाऱ्या शेख पती पत्नींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्वांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना दिलासा, उच्च न्यायालयाकडून सहा आरोपींना जामीन
  2. गाविलगडावर फतेउल्ला इमादशाहाची भव्य कबर; इमादशाहीसह निजामशाही अन् आदिलशाहीची एकाच काळात स्थापना
  3. 'राज्यातील पहिला तृतीयपंथी सामुदायिक विवाहसोहळा', पुरोगामी पिंपरी चिंचवडकरांचा स्तुत्य उपक्रम

Last Updated : Jan 29, 2025, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.