ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटावर अखेर राकेश रोशन यांनी मौन सोडले, केला 'हा' खुलासा... - HRITHIK AND SUSSANNE KHAN DIVORCE

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट 2014मध्ये झाला. आता हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी त्यांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Rakesh Roshan, Hrithik Roshan and Sussanne Khan
हृतिक रोशन, सुजैन खान आणि राकेश रोशन (राकेश रोशन , सुजैन खान आणि हृतिक रोशन (ANI) (instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 30, 2025, 5:39 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक होते. या दोघांचं नात 2014मध्ये तुटलं होतं. घटस्फोटानंतर, हृतिक आणि सुजैन दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. हृतिक आणि सुजैनच्या घटस्फोटामागील कारण कधीच समोर आलेलं नाही. आता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी याबद्दल एक खुलासा केला आहे. दरम्यान हृतिक सबा आझादला डेट करत आहे. तसेच सुजैन ही अर्सलान गोनीबरोबर आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या जोडीदाराबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच हृतिक आणि सुजैन दोघेही त्यांच्या जोडीदाराबरोबर एकत्र पार्टी करताना दिसतात.

राकेश रोशननं केला खुलासा : एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिक आणि सुजैन खानबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. त्यांनी मुलाखतीत म्हटलं, "जे काही झाले ते दोघांमध्ये झाले. माझ्यासाठी, सुजैन आता देखील त्याचप्रमाणे आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांच्यात एक गैरसमज झाला आणि त्यांनी यावर काम देखील केलं. मात्र काहीही ठिक झालं नाही. आमच्यासाठी, ती आमच्या घरी आली, तसेच ती अजूनही कुटुंबातील एक सदस्य आहे. तसेच हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट खूप चर्चेत होता. सुजैनबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अनेकांनी हृतिकला दोषी मानलं होतं.

राकेश रोशनचं त्यांचं मुलाशी नात कसं आहे ? : राकेश रोशन यांनी पुढं सांगितलं, 'हृतिक आणि माझी मुलगी मला थोडे घाबरतात. मला माहित नाही, कदाचित मी खूप शिस्तप्रिय माणूस आहे. मला लवकर राग येत नाही. मी अशा प्रकारचा माणूस नाही, जो कोणालाही शिव्या देईल, पण मी खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहे. जेव्हा ते दोघेही लहान होते, त्यावेळी ते दोघेही माझ्याशी उघडपणे बोलू शकत नव्हते, मात्र आता ते बोलू शकतात. आता आम्ही घरी मित्रांसारखे राहतो." दरम्यान घटस्फोटानंतर, हृतिक आणि सुजैन त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे सह-पालकत्व स्वीकारले आहेत. हृतिक आणि सुजैन हे दोघेही त्यांच्या मुलांबरोबर सहलीला जात असतात.

हेही वाचा :

  1. 25 वर्षांपूर्वी हृतिक रोशनला 'ग्रीक गॉड'ची पदवी कोणी दिली याबद्दल अमिषा पटेलनं केला खुलासा...
  2. ह्रतिक रोशननं शेअर केला आठवणींचा खजीना, पाहा, 'कहो ना प्यार है'च्या डायरीतली सोनेरी पानं
  3. रजनीकांतनं हृतिक रोशनला 'भगवान दादा' शूटिंगमध्ये अशा प्रकारे घेतलं होतं सांभाळून, हृतिकनं केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.