ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेबद्दल माजी मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले, "खात्यात गेलेले पैसे परत..." - LADKI BAHIN YOJANA

लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना छगन भुजबळ आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. यावेळी ते म्हणाले की, लाभ घेतलेल्या महिलांकडून पैसे परत मागण्यात काही अर्थ नाही.

LADKI BAHIN YOJANA
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 10:36 PM IST

पुणे : राज्य सरकारनं सुरू केलेली बहुचर्चित लाडकी बहीण योजनेबाबत विविध माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशी महिलेनं योजनेचा लाभ घेतल्याच समोर आल असताना आता इतर राज्यातील महिलांनी देखील याचा लाभ घेतल्याच्या समोर आलं आहे. याबाबत बोलताना राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ योजनेबाबत आपल स्पष्ट मत व्यक्त केलं.

महिलांकडून पैसे मागण्यात काहीही अर्थ नाही : लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आजही राज्यात अनेक अशिक्षित महिला आहेत. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा, सरकारकडून तसेच कार्यकर्त्यांकडून देखील अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात आले. आत्ता जे नियम आहे ते, तेव्हाही होते. पण, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि अनेकांना याचा लाभ मिळाला. पण, आत्ता या महिलांकडून पैसे मागण्यात काहीही अर्थ नाही. तसेच पैसा वसुली करण्याचा धंदा देखील करू नये जे झालं ते झालं. पण आत्ता सरकारनं जी नियमावली बनविली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ द्यावा. पण सरकार मध्येच एकजण एक सांगत आहे. तर, दुसरा दुसरच काही सांगत आहे. माझी सूचना आहे की, जी काही नियमावली केली आहे. त्यानुसारच या योजनेचा लाभ देण्यात यावा" अस भुजबळ म्हणाले.

कामावर अधिकाऱ्यांनी लक्ष्य देण गरजेचं : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर असून भिडेवाडा येथील कामाची ते पाहणी करणार आहेत. याबाबत त्यांना विचारला असता ते म्हणाले की, "जो पर्यंत आपण या कामाला गती देत नाही तो पर्यंत कामाला गती प्राप्त होणार नाही. त्यामुळं आपण गेलं पाहिजे आणि तिथं जे काम सुरू आहे, त्याची पाहणी केली पाहिजे. आज आयुक्त तसेच अधिकारी यांना बोलावल आहे. फुले वाडा याचा देखील विस्तार करायचं आहे. जागा मोकळी करायची आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच हे काम सुरू आहे. यात स्थानिक अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे अस यावेळी भुजबळ म्हणाले.

हा तर सुवर्ण क्षण : एका लग्नाच्या कार्यक्रमात भाजप, शिवसेना यांची युती कधी होईल अस संभाषण मिलिंद नार्वेकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात झालं आहे. याबाबत भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की, "चांगली गोष्ट आहे. सुवर्ण क्षण आहे तर, मग प्रत्येकानं वाट पाहायला हवी. मला काय याबाबत माहिती नाही. त्याच काय उद्देश आहे ते देखील मला माहिती नाही. याबाबत त्यांचे पक्ष प्रमुख ठरवतील अस यावेळी भुजबळ म्हणाले.

पालकमंत्री पदासोबत माहिती नाही : नाशिकच्या पालकमंत्री बाबत भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मी मंत्री नाही मला पालकमंत्री पदाबाबत माहिती नाही. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाची सुनावणी चालू आहे, त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत आमचं ओबीसी आरक्षण व्यवस्थित राहावे यावर आमचं लक्ष असणार" असल्याचं यावेळी भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'एमपीएससी'ची प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू; आयोगानं केलं 'हे' आवाहन
  2. "पक्ष आण‍ि च‍िन्ह वाचवण्यावर आत्मचिंतन करावं"; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला, आशिष शेलार म्हणाले...
  3. मुंबईतील OTM प्रदर्शनात रामोजी फिल्मसिटी स्टॉलची चर्चा, पर्यटकांची मिळतेय खास पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.