ETV Bharat / bharat

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरी छापा; 'आप'चा आरोप, निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण - CM BHAGWANT MANN

दिल्ली पोलीस छापा टाकण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कपूरथला येथील घरी पोहोचले होते, असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केलाय.

CM Bhagwant Mann
मुख्यमंत्री भगवंत मान आणि आतिशी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 10:48 PM IST

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आम आदमी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी आरोप केला आहे की, "पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील कपूरथला येथील घरावर छापा टाकण्यासाठी दिल्ली पोलीस आले होते."

दिल्लीवाले उत्तर देतील : मुख्यमंत्री आतिशी यांनी 'X' वर लिहिलं की, "दिल्ली पोलीस छापा टाकण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले होते. भाजपाचे लोक दिवसाढवळ्या पैसे, शूज, बेडशीटचं वाटप करत आहेत आणि ते दिसत नाही का? उलट जनतेतून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची घरी छापा टाकला जात आहे. ५ तारखेला दिल्लीवाले उत्तर देतील." जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील 'आप'चे उमेदवार मनीष सिसोदिया म्हणाले, "निवडणूक आयोग बनावट छापे घालतो आणि लोकांमध्ये खोट्या अफवा पसरवतो. लोकांनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे."

निवडणूक आयोगानं आरोप फेटाळले : भारतीय निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, "अशा कोणत्याही छाप्याचे आदेश दिलेले नाहीत. यासोबतच निवडणूक आयोग कोणत्याही एजन्सीच्या तपासात हस्तक्षेप करत नाही." त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकल्याचाही इन्कार केलाय.

पैसे वाटपाची तक्रार आली होती : रिटर्निंग ऑफिसर ओपी पांडे म्हणाले, "सीव्हीजील ॲपवर पैसे वाटपाची तक्रार आली होती. आमची फ्लाइंग स्क्वॉड टीम मान यांच्या निवासस्थानी आली होती, त्यांना आत प्रवेश दिला गेला नाही. आम्ही आत प्रवेश करण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहोत."

हेही वाचा -

  1. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना पोलिसांनी रोखलं; म्हणाल्या, "लोकशाहीची हत्या" - Delhi CM Atishi
  2. दिल्लीत 'महिलाराज'! आतिशींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; याआधी कोण होत्या महिला मुख्यमंत्री? - Atishi Delhi New CM
  3. अरविंद केजरीवाल यांची 'आतिशी' खेळी : शिला दीक्षितांनंतर दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', देशात आत्तापर्यंत 16 महिला मुख्यमंत्री - Delhi CM Announcement

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.