Unhealthy lip Colour: बदलणाऱ्या ओठांच्या रंगात तुमच्या आरोग्याचं हेल्थ सीक्रेट्स दळलेलं आहे. तुमचे ओठ तुमच्या आरोग्याची खिडखी आहेत. आजाराची पहिली चिन्हे अनेकदा ओठांवर दिसतात. तुमच्या ओठांचा रंग शरीरातील रक्ताची पातळी, टेम्प्रेचर तसंच शरीराचे कार्य याच्यांशी संबंधित समस्याबाबत संकेत देत असतात. जन्मताहः प्रत्येक व्यक्तीच्या ओठांचा रंग वेगळा असतो. आपण जस-जसे मोठे होत जातो तस-तसे ओठांच्या रंगात देखील बदल होत असतो. मात्र, जर ओठांचा रंगामध्ये अचानक बदल दिसू लागला तर याकडे दुर्लक्ष करू नका अस तज्ञांच म्हणणं आहे. कारण ओठांचा रंग आरोग्यविषयक अनेक गोष्टी दर्शवतो.
- गुलाबी ओठ: गुलाबी ओठ तुम्ही निरोगी असल्याचं दर्शवते. गुलाबी ओठ असणारे व्यक्ती त्याच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत असतात हे सिद्ध होते.
- जाभंळे किंवा निळे ओठ: हिवाळ्यामध्ये तुमचे ओठ जांभळे किंवा निळे दिसत असल्यास काही हरकत नाही. परंतु रंग तसाच कायम राहिल्यास हे हृदय आणि श्वसनासंबंधित समस्यांचे लक्षणं असू शकते. त्याचबरोबर ओठांवरील हिरवट रेषा देखील खराब रक्त परिसंचरण दर्शवू शकते.
- गडद लाल किंवा निळे: डोकेदुखी, थकवा, निद्रानाश यासारख्या समस्या टाळण्यासाठी शरीराला डिटॉक्सिफाय करणं गरजेचं आहे. गडद लाल किंवा निळे ओठ दर्शवातात की, तुमची पचनक्रिया सुरळीत नाही. यामुळे तुम्हाला शरीर डिटॉक्शिफिकेशन करण्याची नितांत गरज आहे.
- पिवळे ओठ: पिवळे ओठ यकृत नीट काम न करत असल्यास किंवा यकृताशी संबंधित समस्या असल्याच दर्शवते. तसंच विषाणूजन्य संसर्गामुळे देखील ओठांचा रंग पिवळा होवू शकतो. त्याचबरोबर रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे ओठांचा रंग पिवळा दिसू शकतो.
- लाल ओठ: ओठ लाल दिसत असल्यास तुमचं शरीर गरम झाले आहे. तसंच लाल ओठ तुमचं यकृत अकार्यक्षम असल्याचं दर्शवते. यकृत अकार्यक्षम असल्यास तुमचं शरीर गरम होऊ शकते. याव्यतिरिक्त गरम पदार्थ किंवा शीतपेय यांच्या सेवनानं सुद्धा ओठं लाल दिसतात.
(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य माहिती. वाचन दिलेली आहे ईटीव्ही भारत या वैज्ञानिक मान्यतेसाठी सिद्धी करत नाही. अधिक माहितीसाठी सल्ला डॉक्टर घ्या.)