ETV Bharat / state

सत्तेवर आल्यावर सरकारला आश्वासनांचा विसर? गाईच्या दुधाला अनुदानासाठी शेतकऱ्यांचा गाईसह मोर्चा - SUBSIDY FOR COW MILK

राज्य सरकारनं तत्काळ गाईच्या दुधाला अनुदान द्यावं या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गाईसह दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मोर्चा काढला.

SUBSIDY FOR COW MILK
दुध उत्पादक शेतकरी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 5:38 PM IST

Updated : Jan 30, 2025, 6:27 PM IST

कोल्हापूर : जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून गाईचं पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत गाईसह दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढून राज्य सरकारनं तत्काळ गाईच्या दुधाला अनुदान द्यावं अशी मागणी केली. यावेळी उत्पादकांनी राज्य सरकारच्या विरोधातही प्रचंड घोषणाबाजी केली.

...तर तीव्र आंदोलन छेडणार : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं गायीच्या दूध दरात प्रतिलिटर 4 रुपये आणि 3 रुपये अशी दोनवेळा कपात केली आहे. ही कपात थांबवावी आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर सरकारनं 7 रुपये अनुदान जाहीर केलं होतं ते कायमस्वरूपी लागू करावं. या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान सरकारनं अनुदान दिलं नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतीराम घोडके यांनी दिला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन (ETV Bharat Reporter)

अनुदानाचा निर्णय, अंमलबजावणी नाहीच : गाईच्या दुधाला अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊनही याबाबतीत अजून निर्णय झालेला नाही. गत वर्षातील जून ते सप्टेंबर महिन्यातील 180 कोटी तर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचे 550 कोटी अशी एकूण 730 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मात्र, राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्यानं गाय दूध उत्पादकांना दुधावरील अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. यामुळं आक्रमक झालेल्या दूध उत्पादकांनी गाईसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

विधानसभा निवडणुकांमध्ये दूध अनुदानाचाही घोषणा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या घोषणेत गायीच्या दुधावर अनुदान देण्याची घोषणाही होती. मात्र, महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आंदोलना दरम्यान दूध उत्पादकांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात "इतना सन्नाटा क्यों है भाई", राज ठाकरेंची फटकेबाजी करत भाजपावर निशाणा
  2. महायुतीत सहभाग ते सरपंच हत्या प्रकरणावर बच्चू कडू उघडपणे स्पष्टच बोलले; पाहा EXCLUSIVE
  3. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अन् राज्यमंत्री योगेश कदमांना थेट कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Last Updated : Jan 30, 2025, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.