हैदराबाद : महिंद्रानं हलके व्यावसायिक वाहन वीरो सीएनजी, ८.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केलं आहे. महिंद्र वीरो सीएनजी एलसीव्ही सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
महिंद्र वीरो सीएनजी इंजिन :
महिंद्र वीरो सीएनजी भारतात दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. याचं बेस व्हेरिएंट महिंद्र वीरो १.४ XXL एसडी व्ही२ सीएनजी आणि महिंद्र वीरो १.४ XXD एसडी व्ही४ सीएनजी आहे. टर्बो-सीएनजी अनुक्रमे ८९.८४ एचपी आणि २१० एनएमची पीक पॉवर आणि टॉर्क निर्मान करतं.
महिंद्र वीरो सीएनजी मायलेज :
महिंद्र वीरो सीएनजी १९.२ किमी/किलो मायलेज देतं. सीएनजी टँक व्यतिरिक्त, त्यात ४.५-लिटर पेट्रोल टँक देखील आहे. १५० लिटर सीएनजी टँक ४८० किमीची रेंज देतं असून पेट्रोल टँकसह, वीरो ५०० किमीपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.
महिंद्रा वीरो सीएनजी पेलोड क्षमता
महिंद्रा वीरो सीएनजी कोणत्याही प्रकारच्या कार्गोसाठी योग्य असल्याचा दावा केला जातो. वीरोची कार्गो क्षमता १.४ टन आणि कार्गो लांबी ३,०३५ मिमी आहे.
सुरक्षा आणि इतर वैशिष्ट्ये
महिंद्रा वीरो सीएनजीमध्ये सर्वोत्तम दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत. वीरो सीएनजीमध्ये ड्रायव्हर-साइड एअरबॅग, उच्च-शक्तीचे स्टील, फॉल्स स्टार्ट अवॉइडन्स सिस्टम यासारख्या वैशिष्ट्यांसह AIS096 क्रॅश टेस्ट सेफ्टी सर्टिफिकेट आहे. महिंद्रा एअर कंडिशनर, रिक्लाइनिंग ड्रायव्हर सीट, फर्स्ट-इन-सेगमेंट TFT क्लस्टर, इंजिन स्टार्टअप, पॉवर मोड आणि ड्रायव्हर फ्युएल कोचिंग सिस्टमसह चांगला ड्रायव्हिंग अनुभव देतो, असा दावा करण्यात आला आहे.
महिंद्रा वीरो सीएनजी किंमत
महिंद्रा वीरोचे दोन ट्रिम्स आहेत यात १.४ XXL SD V2 CNG आणि १.४ XXL SD V4 (A) CNG चा समावेश आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे ₹८.९९ लाख आणि ९.३९ लाख आहे. महिंद्रा वीरो सीएनजीची थेट मारुती सुझुकी सुपर कॅरी आणि अशोक लेलँड सीएनजीशी स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :