सांगली : विटा इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. तब्बल पावणेतीस कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक केली आहे. विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज मध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावर सोमवारी रात्री छापा टाकत एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला असून तब्बल या प्रकरणी तिघ जणांना अटक करण्यात आली आहे.
विटा शहरातल्या सांगली रोडवरील एमआयडीसी या ठिकाणी गेल्या दीड महिन्यांपासून एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता आणि अखेर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा कारखाना उध्वस्त केला आहे सोमवारी रात्री स्थानिक गुन्हेंविषयी शाखेच्या पथकाने माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकत या ठिकाणी सुरू असलेला एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला आहे.
ज्यामध्ये साडे चौदा किलो एमडी ड्रग्ज सह ड्रग्ज बनवण्यात येणारे साहित्य,असे 29 कोटी 73 लाख 55 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,तसेच तिघा जणांना अटक केली असून यामध्ये गुजरातच्या सुरत येथील एकाचा समावेश आहे.रहुदीप बोरीच्या,भरुच सुरत ,सुलेमान शेख ,मुंबई आणि बलराज कातारी,विटा ,अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत.दीड महिन्यांपूर्वी विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना अटक करण्यात आलेल्या तिघांनी स्थानिक उद्योजकाकडून भाड्याने घेतला होता,आणि त्या ठिकाणी हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता.
याबाबत सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विटा एमआयडीसी मध्ये एका कारखान्याच्या ठिकाणी काही संशयस्पद हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती, त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून कारखान्यातून एकचार चाकी गाडी बाहेर पडल्यानंतर त्या गाडीला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता,त्यामध्ये साडे चौदा किलो एमडी ड्रग्स सदृश्य पावडर आढळून आली,त्यानंतर त्याची तपासणी केली असता सदरची पावडर एमडी ड्रग्ज असल्याचा अहवाल समोर आल्यावर माऊली इंडस्ट्रीज मध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून त्या ठिकाणाहून एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आलं, हा सर्व मुद्देमाल जवळपास 29 कोटी 73 लाख 55 हजार इतकया किंमतीचा असून या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्याचे कनेक्शन कुठेपर्यंत आहेत ? याबाबतचा तपास सुरू करण्यात आला असून वेगवेगळी पथक देखील यासाठी नेमण्यात आलीची माहिती ,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.
हेही वाचा :