मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद-विवादापासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. जेवन वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे आपणास फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे.
वृषभ (TAURUS) : आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर आणि मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता आणि सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आज नवे कपडे, आणि दागिने ह्यांची खरेदी झाल्यानं दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन (GEMINI) : आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्यानं प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय आणि मुलांशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा आणि व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.
कर्क (CANCER) : आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साहात आणि आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी आणि संततीकडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
सिंह (LEO) : आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळं आपलं प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील आणि त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या (VIRGO) : आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळं आर्थिक फायदा होईल.
तूळ (LIBRA) : आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रू पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडं आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक (SCORPIO) : आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.
धनू (SAGITTARIUS) : आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी-व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
मकर (CAPRICORN) : आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. निर्णयाच्या अभावामुळं मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.
कुंभ (AQUARIUS) : आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रां विषयी सावध राहावे लागेल.
मीन (PISCES) : आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा आणि मानसिक स्थैर्य ह्यामुळं कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळं मन प्रसन्न राहील. स्वकीयांशी जवळीक वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
हेही वाचा -
करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ 12 राशींसाठी कशी असेल?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य