बुलावायो ZIM vs IRE Test Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना 06 फेब्रुवारी (बुधवार) पासून क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथं खेळला जाईल. दोन्ही संघ प्रथम एकाच कसोटी सामन्यात एकमेकांसमोर येतील, त्यानंतर तीन T20 आणि तीन वनडे सामने होणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे आयर्लंडचं यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल.
Wear your colours and rally behind the boys against Ireland this February, as the two sides first lock horns in a Test match at Queens Sports Club in Bulawayo from 6 to 10 February.
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 23, 2025
The action will then move to Harare Sports Club in the capital for the white-ball segment of the… pic.twitter.com/msxEQ0oEdY
एकमेव सामन्यात आयरिश संघाचा विजय : याआधी, दोन्ही संघांमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे, जो जुलै 2024 मध्ये बेलफास्टमध्ये झाला होता. त्या सामन्यात आयर्लंडनं झिम्बाब्वेचा चार विकेट्सने पराभव केला. बेलफास्टमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँडी मॅकब्राइननं शानदार कामगिरी केली. त्यानं एकूण 7 विकेट्स घेतल्या आणि 83 धावांची महत्त्वाची खेळीही केली ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ही मालिका झिम्बाब्वे आणि आयर्लंड दोघांसाठीही खूप महत्त्वाची असेल. आयर्लंड आपल्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल, तर झिम्बाब्वे यावेळी घरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
𝕊𝕋𝔸ℝ𝕋𝕊 𝕋ℍ𝕌ℝ𝕊𝔻𝔸𝕐
— Cricket Ireland (@cricketireland) February 4, 2025
We're #BackingGreen this Thursday with the start of the Zimbabwe tour.
Here's the schedule for the series.
See more details here: https://t.co/rmADgohCyE
C'mon, Ireland! 👊@FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/sgnJte0izv
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : आतापर्यंत झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात 1 कसोटी सामना खेळला गेला आहे, या सामन्यात झिम्बाब्वेला विजय मिळाला नाही, तर आयर्लंडनं हा सामना जिंकला आहे. यानंतर आता दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे, ज्यात आयर्लंडनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
Welcome, siyalamukela, tigashire @cricketireland men's team.#ZIMvIRE #VisitZimbabawe pic.twitter.com/svRwPq2XkL
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 3, 2025
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 06 फेब्रुवारी (बुधवार) पासून क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळला जाईल. याची नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.
The countdown is on.
— Cricket Ireland (@cricketireland) February 4, 2025
Test starts this Thursday.
Can’t wait - good luck, lads!#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/aPcVrH7VxW
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाणार नाही. तथापि, भारतीय प्रेक्षक फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे या मालिकेतील सर्व सामने पाहू शकतात.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
आयर्लंड : अँड्र्यू बाल्बर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, अँड्र्यू मॅकब्राइन, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, मॉर्गन टॉपिंग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
झिम्बाब्वे : बेन करन, क्रेग एर्विन (कर्णधार), निक वेल्च, ब्रायन बेनेट, जॉनाथन कॅम्पबेल, शॉन विल्यम्स, व्हिन्सेंट मसाकेसा, जॉयलॉर्ड गुम्बी (यष्टीरक्षक), ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, ट्रेवर ग्वांडू.
हेही वाचा :