ETV Bharat / state

"निवडणूक घेऊन पश्चाताप होईल...", जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा - Manoj Jarange Patil On Goverment - MANOJ JARANGE PATIL ON GOVERMENT

Manoj Jarange Patil On Goverment : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर मेळावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

Manoj Jarange Patil On Goverment
जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 5:03 PM IST

Updated : Sep 30, 2024, 5:15 PM IST

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil On Goverment : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज (30 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलय. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाण साधला.

पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही : पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. "सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केला नाही, तर आगामी निवडणुकीत पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही."

जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा (Source - ETV Bharat Reporter)

अमित शाह सूर्य आहेत का? : जरांगे पाटील यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांनी अमित शाहांवर बोलणं म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखं आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, टीका न करण्यासाठी अमित शाह हे काय सूर्य आहेत का? ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचं आंदोलन सरकारनं गोडीगुलाबीनच हाताळावं. मराठ्यांचा नाद करू नका. पटेल, जाट, गुर्जर एकत्र आले, तर तुम्हाला बाहेर पडणं देखील अवघड होईल. दिल्लीचं आंदोलन, शेतकरी आंदोलन किंवा पंजाबचं आंदोलन कसं हाताळलं ते आम्हाला सांगू नका, असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.

नखरे बंद करा : "राज्य सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढंच देवेंद्र फडणवीस यांना सांगणं आहे. सरकारनं अभ्यासकांना बोलावल्याचं सांगितलं. आता सरकारला अभ्यासक कशासाठी पाहिजेत. अभ्यासक बोलावण्याचे नखरे बंद करा. सरकार तर तुमचं आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार हा सरकारकडे असतो. तुम्ही निर्णय का घेत नाही", असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला.

दसरा मेळाव्याची घोषणा : जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर आपला दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा केली. "नारायण गडावर पारंपरिक दसरा मेळावा आयोजित केला आहे, त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी. विशेषतः मराठवाड्यातील बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहावं. मेळाव्यात राजकीय विषय किंवा कुठलाही निर्णय होणार नाही. इतरांचे डोळे फाटतील एवढी गर्दी नारायणगडावर होईल," असं जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा

  1. "एन्काऊंटर केलं, आता तुमचं राजकीय एन्काऊंटर होईल...", मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा - Manoj Jarange Patil On Amit Shah
  2. ‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." - Supriya Sule
  3. आमदार नितेश राणेंच्या फेसबुक लाईव्हवर आक्षेपार्ह कमेंट्स; गुन्हा दाखल होणार - NITESH RANE NEWS

Last Updated : Sep 30, 2024, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.