ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर पाच कोटीचं कोकेन जप्त, काँगोच्या महिलेनं शरीरात लपवून आणल्या कॅप्सूल - DRI ARRESTED CONGO WOMAN

मुंबई विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या काँगोच्या महिलेला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या महिलेनं शरीरातून कोकेनची तस्करी केल्याचं तपासात उघड झालं.

DRI Arrested Congo Woman
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2025, 9:51 AM IST

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ही महिला डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाची नागरिक आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) नं या महिलेवर कारवाई केली आहे. या महिलेनं 544 ग्रँम कोकेन कॅप्सूलमध्ये भरुन त्या कॅप्सूल आपल्या शरीरात लपवल्या होत्या. या कॅप्सूलमध्ये भरुन शरीरातून लपवून आणलेल्या कोकेनची किंमत सुमारे पाच कोटी 44 लाख रुपये आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिलेनं शरीरात लपवून आणलं कोकेन : डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या खबरीवरुन ही कारवाई करण्यात आली. डीआरआय अधिकाऱ्यांनी संशयित महिला अदिस अबाबा इथून मुंबई विमानतळावर उतरताच तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी महिलेची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी महिलेनं तिच्या शरीरात लपवून आणलेल्या कोकेनची डीआरआयला माहिती दिली. याबाबत सदर महिलेला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. वैद्यकीय तपासणीनंतर या महिलेच्या शरीरात लपवून आणलेलं कोकेन बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर नार्कोटिक ड्रग्ज अँन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (एनडीपीएस) अन्वये कोकेन ताब्यात घेण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेचा सहभाग ? : अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी डीआरआयकडून सातत्यानं उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्या संघटनेचा सहभाग आहे का, याचे धागेदोरे तपासले जात आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून सोनं, अमली पदार्थ यांच्या होणाऱ्या तस्करीचं प्रमाण मोठं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून असे प्रकार वारंवार होतात. आपल्या देशातून बाहेर जाणाऱ्या अशा पदार्थांचं प्रमाण देखील मोठं आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी डीआरआयकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. मात्र, अनेकदा त्यावर मात करुन आरोपी तस्करी करतात. आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याच्या तस्करीचं प्रमाण देखील मोठे आहे. मुंबई विमानतळावर डीआरआय, सीआयएसएफ, सीमाशुल्क विभाग, एआययु अशा विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.

हेही वाचा :

  1. 'उडता गुजरात' ; अंकलेश्वरमधून तब्बल 5 हजार कोटीचं कोकेन जप्त
  2. विदेशातून आलेल्या प्रवाशानं 11 कोटींचं कोकेन लपविण्यासाठी लढवली अनोखी शक्क्ल; गुपित उघडताच डीआरआयनं घेतलं ताब्यात - Cocaine of 11 Crore Seized
  3. DRI Seized Cocaine: 'डीआरआय'कडून फिल्मी स्टाईलनं आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 100 कोटींचं कोकेन जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.