हैदराबाद Apple iPhone 16e : Apple नं आज त्यांचा नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन iPhone 16e लाँच केला. हा iPhone 16 मालिकेतील नवीनतम मॉडेल आहे ज्यामध्ये 6.1-इंच OLED स्क्रीन आणि A18 चिप आहे. नवीन iPhone 16e iPhone 15 Pro (2023) आणि iPhone 16 मालिकेसारख्या Apple Intelligence वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. यात 48-मेगापिक्सेल सिंगल रियर कॅमेरा आणि प्रोग्रामेबल ॲक्शन बटण आहे.
Meet iPhone 16e. Built for Apple Intelligence and powered by A18 — the latest-generation chip — it comes packed with a 48MP Fusion camera, supersized battery life and a durable design.
— Apple (@Apple) February 19, 2025
iPhone 16e स्पेसिफिकेशन
कंपनीनं या फोनमध्ये 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED (1,170x2,532 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 800 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन मजबूत करण्यासाठी Apple Ceramic Shield चा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 3nm A18 चिप प्रोसेसर आहे, जे पहिल्यांदा iPhone 16 मध्ये वापरलं होतं. डिव्हाइसमध्ये जास्तीत जास्त 512GB पर्यंत स्टोरेज आहे.
कॅमेरा सेटअप
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीनं iPhone 16e मध्ये 48MP चा सिंगल कॅमेरा दिला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह येतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात फेस आयडी सपोर्ट आहे, तर आयफोन SE (3rd Gen) मध्ये टच आयडी देण्यात आला होता. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसंच, कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, NFC आणि GPS सपोर्ट सारखे फीचर्स आहेत. या फोनमध्ये Apple चा Emergency SOS via Satellite सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट आहे, जो 18W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनला IP68 रेटिंग आहे, म्हणजेच धूळ आणि पाण्यानंही तो खराब होत नाही. या फोनचे वजन 167 ग्रॅम आहे.
काय आहे किंमत
कंपनीनं भारतात आयफोन 16ईच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये ठेवली आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. फोनची प्री-ऑर्डर बुकिंग 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. त्याच वेळी, या फोनची विक्री 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. कंपनीनं हा फोन काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये लाँच केला आहे.
हे वाचलंत का :