Morning Habits To Help Lose Weight: वजन कमी करणं अनेकांना कसरतीचं काम वाटतं. वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. परंतु, त्यापासून फारसा फायदा होत नाही. शरीराचा आकार परत मिळण्याचा प्रयत्न करताना कंबरेवरील चरबी कमी करणे हे सर्वात आव्हानात्मक बाब आहे. शरीराच्या इतर भागांपेक्षा कंबरेभोवतीची चरबी कमी करणं थोडं कठीण आहे. परंतु तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येतील काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास ही समस्या सहज सोडवता येवू शकते. चला तर पाहूया चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या दिनचर्येत काय बदल करावेत.
- लिंबू पाणी: सकाळी लिंबू पाणी पिणे सर्वात उत्तम आहे. याकरिता एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस घाला. याच्या नियमित सेवनानं चयापयच सुधारण्यास मदत होते. तसंच पनास मदत करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येवू शकते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. जास्त परिणामांसाठी या पेयासोबतच खाली दिलेले उपाय समाविष्ट करा.
- व्यायाम: ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, नाश्त्यापूर्वी व्यायाम केल्याने शरीरातील चरबी जलद वितळवण्यास मदत होते. कारण, सकाळी शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे उर्जेसाठी कार्बोहायड्रेट्सऐवजी चरबी जाळली जाते. यामुळे शरीरात साचलेली चरबी काढून टाकण्यास मदत होऊ शकते. अभ्यासातून असेही दिसून आलं आहे की, नियमितपणे सकाळी चालणे, सायकलिंग आणि स्किपिंग यासारख्या शारीरिक हालचाली समाविष्ट केल्याने कंबरेची चरबी जलद गतीनं कमी होण्यास मदत होते.
- श्वास घेण्याचे व्यायाम: ताणतणाव हे पोटातील चरबी जमा होण्याचे एक मुख्य कारण आहे. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे कंबरेभोवती चरबी जमा होऊ शकते. म्हणून दररोज सकाळी खोल श्वास घेण्याचे व्यायाम, योगासने आणि ध्यान करा. यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होईल. यामुळे कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यास देखील मदत होईल. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, व्हिटॅमिन डीचा कंबरेवरील चरबी कमी करण्यावर परिणाम होतो. चयापचय नियंत्रित करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरेल. दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी निरोगी राहण्यास मदत होईल.
- प्रथिनेयुक्त नाश्ता: तुमच्या नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, यामुळे कॅलरीजचे सेवन कमी होण्यास मदत होते. भूक नियंत्रित करण्यासाठी आणि अन्नाची तल्लफ कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होईल. म्हणून, तुमच्या नाश्त्यात अंडी, कॉटेज चीज आणि नट्स सारखे प्रथिनेयुक्त पदार्थ समाविष्ट करा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)