ETV Bharat / technology

आत्महत्या प्रकरणानंतर आयआयटीत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, प्रवेशावेळी वैद्यकीय तपासणी अनिवार्य - IIT GUWAHATI - IIT GUWAHATI

IIT GUWAHATI : IIT गुवाहाटीनं विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी प्रवेशाच्या वेळी वैद्यकीय तपासणी अनिवार्य केलीय. या वर्षी संस्थेत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

IIT GUWAHATI
आयआयटी गुवाहाटी (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 30, 2024, 1:12 PM IST

Updated : Oct 1, 2024, 10:16 AM IST

हैदराबाद IIT GUWAHATI : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), गुवाहाटीनं विद्यार्थ्य्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. IIT विद्यार्थ्य्यांच्या प्रवेशासाठी सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी अनिवार्य केलीय आहे. या वर्षी आयआयटी कॅम्पसमध्ये एकूण ती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अलीकडेच, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला संगणक विज्ञान शाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. तसंच विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यासाठी योग्य आधार देण्याची मागणी केली होती.

IIT GUWAHATI
IIT गुवाहाटीचं परिपत्रक (IIT GUWAHATI)

वैद्यकीय तपासणी अनिवार्य : आता संस्थेनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, यातील अनेक घटना (आत्महत्या) गैर-शैक्षणिक स्वरूपाच्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी उत्तम सपोर्ट सिस्टीम आणि प्रतिबंधात्मक उपायांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी आयआयटी गुवाहाटीनं अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मुक्त संवाद, प्रगत समुपदेशन सेवा, प्राध्यापक सल्लागार प्रणाली, सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. IIT गुवाहाटी प्रवेशाच्या वेळी एक वेळ अनिवार्य वैद्यकीय तपासणी सुरू करत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आवश्यक काळजी सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थी तणावाखाली : आंदोलन करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणारा विद्यार्थी मानसिक तनावाखील असल्याचा आरोप केला होता. मृत विद्यार्थ्यानं आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रं सादर केली होती, परंतु त्यांचा विचार केला गेला नाही, ज्यामुळे तो अधिक तणावग्रस्त झाला. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली असावी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या प्रकणानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीचे डीन केव्ही कृष्णा यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

हे वाचंलत का :

  1. AB PM JAY योजनेत नागरिकांवर मोफत उपचार, 'असा' करा ऑनलाइन अर्ज - AB PM JAY Yojana
  2. राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार मोफत; पात्रता, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही - Mukhyamantri Annapurna Yojana
  3. व्होडाफोन आयडियासोबत नोकियाची मोठी डील, 4G आणि 5G बाबत करार - Vodafone Idea 4G and 5G deal

Last Updated : Oct 1, 2024, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.