ETV Bharat / sports

WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर, 180 धावा काढुनही RCB चा घरात पराभव - FIRST EVER SUPER OVER

महिला प्रीमियर लीगचा 9वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

First Super Over in WPL
महिला प्रीमियर लीग (WPL X Handle)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 25, 2025, 11:14 AM IST

बंगळुरु First Super Over in WPL : महिला प्रीमियर लीग (WPL 2025) मध्ये 24 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात, UP वॉरियर्सनं सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा पराभव केला. WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच, सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. यूपी वॉरियर्सच्या या विजयात सोफी एक्लेस्टोननं महत्त्वाची भूमिका बजावली, तिनं प्रथम फलंदाजीनं शानदार खेळी केली आणि नंतर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, यूपी वॉरियर्स संघानंही समान धावसंख्या केली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सामन्यात रंगला सुपर ओव्हरचा थरार : हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, यूपी वॉरियर्सनं सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत 8 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरसीबी स्मृती मानधना आणि रिचा घोषसह मैदानात उतरले परंतु एक्लेस्टोनच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांना फक्त 4 धावा करता आल्या, ज्यामुळं यूपी वॉरियर्सना विजय मिळाला. या विजयासह, यूपी वॉरियर्सने WPL 2025 मध्ये जोरदार पुनरागमन केलं आणि सोफी एक्लेस्टोननं दबावातही ती मॅचविनर असल्याचं सिद्ध केलं.

कसा झाला सामना : प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीनं एलिस पेरीच्या नाबाद 90 आणि डॅनी वायटच्या 57 धावांच्या जोरावर 6 बाद 180 धावांचा मोठा आकडा उभारला. प्रत्युत्तरादाखल, सोफी एक्लेस्टोन (33), श्वेता सेहरावत (31), दीप्ती शर्मा (25) आणि किरण नवगिरे (24) यांच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळींच्या जोरावर यूपी वॉरियर्सनं 180 च्या जवळपास धावसंख्या गाठली. शेवटच्या षटकात यूपीला 18 धावांची आवश्यकता होती. रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार मारुन एक्लेस्टोननं सामना जवळजवळ जिंकला होता पण शेवटच्या चेंडूवर ती धावबाद झाली आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हरमध्ये युपीचा विजय : परिणामी सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यानंतर यूपीनं विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या रोमांचक सामन्यात आरसीबीकडून स्नेहा राणानं 3, रेणुका सिंगनं 2 आणि किम गार्थनं 2 विकेट घेतल्या. यूपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा आणि चिनेल हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा :

  1. BAN vs NZ सामन्यात 'कीवीं'चा विजय, टीम इंडियाला फायदा तर पाकिस्तानचं 'पॅकअप'
  2. BAN vs NZ 6th Match Live: पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या सामन्यावर कीवींची पकड; बांगलादेश अडचणीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.