मुंबई - मल्याळम अभिनेत्री मंजू वॉरियरचा 'फुटेज' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटानं दाक्षिणात्य प्रेक्षकांना हादरवून टाकलं होतं. सस्पेन्स थ्रिलरच्या बाबतीत मल्याळम चित्रपट आघाडीवर असतात हे या चित्रपटानं पुन्हा सिद्ध केलं होतं. आता हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार असून बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटाचं प्रेझेन्टेशन करणार आहे.
ANURAG KASHYAP PRESENTS *HINDI VERSION* OF MANJU WARRIER'S ACCLAIMED MALAYALAM THRILLER 'FOOTAGE'... #AnuragKashyap has come on board to present the #Hindi version of the acclaimed #Malayalam thriller #Footage, which will release *theatrically* on 7 March 2025.
— taran adarsh (@taran_adarsh) February 25, 2025
🔗:… pic.twitter.com/unld9GDY5W
अलीकडच्या काळात अनुराग कश्यप हा साऊथ इंडियन सिनेमाच्या कार्यात बिझी झाला आहे. काही महिन्यापूर्वी हिंदी चित्रपटासृष्टील कामाचा कंटाळा आल्याचं वक्तव्य अनुरागनं केलं होतं. आगामी काळात साऊथमध्ये जाऊन काम करणार असल्याचंही त्यानं जाहीर केलं होतं. त्यानंतर अनुराग अनेक साऊथच्या चित्रपटातून झळकला. मुख्य म्हणजे 'महाराजा' आणि 'रायफल क्लब' या दोन साऊथच्या चित्रपटात तो व्हिलन म्हणून झळकला होता. त्याच्या या भूमिकांचं खूप कौतुकही झालं होतं. दाक्षिणात्य चित्रपटातून भूमिका करत असतानाच त्यानं आता 'फुटेज'सारखा चित्रपट प्रझेन्ट करण्याची जबाबदारीही उचलली आहे. आगामी काळात तो साऊथच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसला तर त्यात आश्चर्य वाटलं जाऊ नये.
एका जिज्ञासू जोडप्याच्या कथेभोवती फिरणारा 'फुटेज' या चित्रपटात अभिनेत्री मंजू वॉरियर हिच्यासह विशाख नायर आणि गायत्री अशोक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फुटेज हा चित्रपट सैजू श्रीधरन यांचा दिग्दर्शनात पदार्पण करणारा हिट चित्रपट होता. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार 'महेशिंते प्रतिकारम'मध्ये एडिटर म्हणून काम केलं होतं. या चित्रपटाला केरळमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळं सर्वजण चकित झाले होते. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचं भरपूर कौतुक केलं होतं.
'फुटेज' या चित्रपटाची निर्मिती बिनेश चंद्रन आणि सैजू श्रीधरन यांनी मूव्ही बकेट, पेल ब्लू डॉट फिल्म्स, कास्ट एन को एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट राहुल राजीव आणि सूरज मेनन यांनी सह-निर्मित केला असून अनुराग कश्यप सादर करत असलेला हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी हिंदी भाषेत रिलीज होईल.
हेही वाचा -