मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आज त्याचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 फेब्रुवारी हा दिवस शाहिदच्या चाहत्यांसाठी देखील विशेष आहे. अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूरनं सोशल प्लॅटफॉर्मवर तिच्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. मीरानं इन्स्टाग्रामद्वारे तिच्या भावना व्यक्त करत काही सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस, माझ्या जगाचा प्रकाश आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट तूच आहेस. तुझ्यात जादू आहे.'
शाहिद कपूरचा वाढदिवस : आता शेअर केलेल्या फोटोत मीरा आणि शाहिद रोमँटिक अंदाजात दिसत आहे. मीरा कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहते. अनेकदा ती आपल्या पती आणि मुलांबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत असते. अलीकडेच, मीरानं मालदीवमधील तिच्या सुट्टीतील काही सुंदर फोटो शेअर केले होते. पती आणि मुलांसह सुट्टी घालवताना मीरा खूप आनंदी असल्याची दिसली. मीरा आणि शाहिद यांचं लग्न 2015मध्ये झालंय. या दोघांचे लग्न खूप चर्चेत आले होते.
बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची केली सुरुवात : शाहिद कपूरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं 'दिल तो पागल है' आणि 'ताल' सारख्या चित्रपटांमध्ये बॅकग्राउंडमध्ये डान्स केला आहे. 2003मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' या चित्रपटातून त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानंतर, शाहिदनं 'जब वी मेट', 'कमिने', 'उडता पंजाब' 'हैदर' आणि 'कबीर सिंग' सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलीकडेच 'देवा' चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटाच तो साऊथ अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर झळकला. 'देवा' चित्रपटामध्ये शाहिदचा दमदार लूक पाहायला मिळाला. 'देवा' चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. आता पुढं तो रवि के दिग्दर्शित 'अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच त्याच्याकडे 'अर्जुन उस्तारा' हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तो तृप्ती डिमरीबरोबर दिसेल.
हेही वाचा :