Hypochondriasis Disorder: आपल्यापैकी काही लोकांना कोणताही आजार नसला तरी ते एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत अशी भिती सतत सतावत असते. यामुळे ते नेहमी रुग्णालयात जातात आणि सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेतात. त्यांना स्वतःला असं वाटते की, डॉक्टर त्यांच्या आजाराचे निदान करू शकत नाहीत. चाचण्यांचा अहवाल जरी सामान्य असला तरी ते वारंवार रुग्णालये आणि डॉक्टर बदलतात. तुम्हालाही असं वाटते काय? चला तर जाणून घेऊया हे का घडते? याची मुख्य कारणे काय आहेत.

- संशोधन काय म्हणतो: तज्ञांच्या मते, हा एक मानसिक आजार आहे. हा एक दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. यामध्ये निरोगी असून देखील लोकांना वाटते की, त्यांना एखादा आजार झालाय. जरी त्यांना कोणताही आजार नसला तरी ते आजारी असल्याचाच विचार करतात. लोकांच्या या स्थितीला हायपोकॉन्ड्रियासिस डिसऑर्डर म्हणतात. साधा आणि किरकोळ आजारही त्यांना मोठा वाटू लागतो. यामुळे तणाव, नैराश्य तसंच भीती वाटणे या समस्या निर्माण होतात. परिणामी नातेंसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. 2018 च्या जर्नल ऑफ क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या 'हायपोकॉन्ड्रियासिस: अ रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर' या अभ्यासात हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

- हायपोकॉन्ड्रियासिस डिसऑर्डरची लक्षणं
- एकट राहणं पसंत करणे.
- तब्येतीची सतत काळजी घेणे.
- सतत डॉक्टरांकडे जाणं तसंच वारंवार डॉक्टर बदलणे.
- सतत आजारांबद्दल पुस्कता किंवा इंटरनेटवर त्यासंबंधित गोष्टी वाचणे.
- लहान आजारही मोठा वाटणे.
- रिपोर्ट नॉर्मल देखील असली तरी आजाराची भीती वाटणे.
- नेहमी आजारांबद्दल विचार करणे.

- तज्ञ काय म्हणतात?
तज्ञांच्या मते ही समस्या उद्भवण्यामागचं कारण म्हणजे या लोकांचा असा ठाम विश्वास असतो की, त्यांना कोणतातरी आजार झाला आहे. जरी त्यांना प्रत्यक्षात आजार नसला तरी. या आजाराच्या भीतीमुळे रक्तदाब वाढतो. काही लोक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेटल्यावर त्यांचा रक्तदाब लवकर वाढतो. तीव्र ताणतणावामुळे ते अनेकदा नैराश्यात जातात.
- एक्सपोजर थेरपी: जर एखाद्या व्यक्तीला अशी लक्षणे आढळली तर त्यांनी विलंब न करता ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मानसिक आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. आजार अस्तित्वात नसला तरी तो असतो हा एक भ्रम आहे. रुग्णांना चिंता कमी करण्यासाठी समुपदेशन आणि औषधं दिली जातात. औषधांनी हा आजार नियंत्रित करता येतो. औषधांव्यतिरिक्त, काही लोकांना एक्सपोजर थेरपी देखील घेऊ शकतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK554399/