मुंबई- राज्याचा कारभार ज्या ठिकाणी चालतो, त्या मंत्रालयात दररोज हजारो लोक गाव-खेड्यातील आपल्या विविध कामासाठी येतात. दुसरीकडे नवीन सरकारने मंत्रालयातील प्रवेशासाठी नियम आणि अटी अधिक जाचक केल्या आहेत. तर मंत्रालयातील प्रवेशासाठी लोकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एका व्यक्तीने मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनाचं कारण काय? : आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव विजय साष्टे असून, पुण्यातील वारजे येथून ही व्यक्ती आले होती. आपले महसूल विभागातील काम होत नसल्यामुळं आणि एक मंत्री आपले काम करत नसल्यामुळं या व्यक्तीने सातव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर बांधलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. उडी मारल्याचे समजतात पोलिसांनी तत्काळ जाळीवर जाऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र तो व्यक्ती बाहेर येत नव्हता. आपल्या भूमिकेवर ठाम होता. ज्यावेळी त्यांना उडी मारली त्यावेळी त्याच्या हातात इन्क्लाब जिंदाबादचे पेपर होते. तसेच काही पेपर हातात घेऊन त्याने जाळीवर फेकले होते. पोलिसांनी त्याला बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालय दाखल करण्यात आलंय.
पत्रकारांना धक्काबुक्की : दुसरीकडे या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जमले असता वार्तांकन करणारे पत्रकार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय. वार्तांकन करण्यासाठी पोलिसांनी पत्रकारांना अडवले आणि धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध म्हणून पत्रकारांनी मंत्रालयाच्या तळमजल्यावर ठिय्या आंदोलन केले आणि जोपर्यंत अधिकारी माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा पवित्रा पत्रकारांनी घेतलाय. दरम्यान, पत्रकार आणि पोलिसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थ घेऊन दोघांमध्ये एक बैठक घेऊन यावर तोडगा काढा आणि प्रवेशासाठी पत्रकारांना अडवले जाते त्यावर देखील तोडगा काढा, असे पत्रकार आणि पोलिसांना सांगितले.
हेही वाचा -