ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी भीमराव दराडे यांची नियुक्ती - SHIRDI SAIBABA SANSTHAN

राज्य शासनानं शिर्डी साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) पदासाठी भीमराव दराडे यांची नियुक्ती केली आहे.

SHIRDI SAIBABA SANSTHAN
शिर्डी साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी भीमराव दराडे यांची नियुक्ती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 9:29 PM IST

Updated : Feb 25, 2025, 9:37 PM IST

अहिल्यानगर : राज्य शासनानं शिर्डी साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) पदासाठी भीमराव दराडे यांची नियुक्ती केली आहे. दराडे हे अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असून ते नेवासाचे रहिवासी आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळं स्थानिक स्तरावर समाधान व्यक्त केलं जात आहे.

दराडे यांच्याकडं उपमुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी : भीमराज दराडे यांच्याकडं यापूर्वी जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी होती. त्यांनी प्रशासनात विविध पदांवर काम करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत शासनानं त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थानकडं बदली केली आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले तुकाराम हुलवळे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर संदीप भोसले यांच्याकडं या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, आता भीमराव दराडे यांच्या रूपानं पुन्हा एकदा जिल्ह्याच्या भूमिपुत्राला या महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे.

राज्यातील श्रीमंत देवस्थान म्हणून प्रसिद्ध : देशातील दोन नंबर आणि महाराष्ट्रातील एक नंबरचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यामुळं संस्थानच्या कारभारात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाला विशेष महत्त्व आहे. दराडे यांच्या अनुभवाचा संस्थानच्या प्रशासनात निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अनुभवाचा होईल फायदा : भीमराव दराडे यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळं त्याचा फायदा शिर्डी साई संस्थानला होईल, अशी अपेक्षा स्थानिकांची आहे. देश-विदेशातील भाविकांची दर्शन व्यवस्था, संस्थानचे आर्थिक गणित, इतर मॅनेजमेंट अशी विविध मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'या' प्राचीन मंदिरात शिवाजी महाराजांनी घेतलं होतं दर्शन, महाशिवरात्रीला रंगतो 'शिव पार्वती विवाह सोहळा'
  2. महादेवाचे सर्वात मोठे भक्त असलेले 10 बॉलिवूड सेलेब्रिटी, जाणून घ्या त्यांची शिवभक्ती
  3. गंगा नदीचं पाणी पवित्र आणि शुद्ध का राहतं? १३० वर्षांपूर्वीच झालं होतं संशोधन

Last Updated : Feb 25, 2025, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.