ETV Bharat / spiritual

शारदीय नवरात्रीत 'अशी' करा घरात घटस्थापना; जाणून घ्या, शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024 - NAVRATRI 2024

Navratri 2024 : येत्या 03 सप्टेंबरपासून नवरात्रीला (Shardiya Navratri) सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना (Ghatasthapana) केली जाते. नवरात्रीचं व्रत करुन दुर्गा मातेची पूजा केली जाते. घटस्थापनेलाच 'कलश स्थापना' (Kalash Sthapana) म्हटलं जातं. तेव्हा नवरात्रौत्सवासाठी घटस्थापना कशी कराल? तसेच काय आहे शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या 'ईटिव्ही भारत'च्या बातमीतून.

Ghatasthapana 2024
घटस्थापना 2024 (ETV Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 8:20 PM IST

Updated : Sep 30, 2024, 3:42 PM IST

हैदराबाद Navratri 2024 : हिंदू धर्मात नवरात्रीला (Shardiya Navratri) खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव (Navratri Festival) जवळ आला आहे. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. (Navratri Utsav 2024) यावेळी गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे.

घटस्थापनेचे साहित्य : नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापडे परिधान करा. त्याचप्रमाणं मातीचे लहान मडके, विविध प्रकरची धान्ये, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतासाठी तांदुळ, आंब्यांची डहाळी (आंब्याची पाने), पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, श्रृंगार पेटी, फुलांचे हार, इत्यादी साहीत्य लागते.

अशी करा घटस्थापना (Ghatasthapana) : कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंबाची पाने ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावा.

घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta) : नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे.

दसरा मुहूर्त कधी आहे? : शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजेच 'दसरा' आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 02 वाजून 22 मिनिटांपासून ते 03 वाजून 09 मिनिटांपर्यंत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.

हेही वाचा -

  1. शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours
  2. शारदीय नवरात्रीत करा 'या' नऊ देवीची आराधना; मनोकामना होतील पूर्ण - Shardiya Navratri 2024
  3. शारदीय नवरात्री 2024; यंदा पालखीत येणार दुर्गा माता, मानवी जीवनावर होणार परिणाम - Durga Devi Vahan 2024

Last Updated : Sep 30, 2024, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.