कोलकाता Abhishek Sharma Record : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला, जो भारतीय संघानं 7 विकेट्सनं जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाला 133 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, जे त्यांनी अभिषेक शर्माच्या 79 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर केवळ 12.5 षटकांत पूर्ण केलं. या खेळीसह अभिषेकनं युवराज सिंगचा 18 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. अभिषेकनं त्याच्या खेळीदरम्यान फक्त 34 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 8 षटकारही मारले.
Abhishek Sharma's explosive knock outclassed England in the T20I series opener in Kolkata 💥#INDvENG 📝: https://t.co/9nrI1DaGqi pic.twitter.com/aLigXoyyaN
— ICC (@ICC) January 22, 2025
इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू : या सामन्यापूर्वी, भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्यानं 2008 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात डरबन इथं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार मारले होते. त्याच्या 58 धावांच्या खेळीत एकूण 7 षटकार मारले गेले. आता, अभिषेक शर्मानं इंग्लंडविरुद्ध भारतासाठी T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा त्याचा 18 वर्षांचा जुना विक्रम मागे टाकला आहे. त्याच वेळी, अभिषेक आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही T20 सामन्यात दोन्ही संघांकडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.
𝘼 𝙎𝙩𝙮𝙡𝙞𝙨𝙝 𝙁𝙞𝙛𝙩𝙮 😎
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Abhishek Sharma starts the #INDvENG T20I series on the right note 👍
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U7Mkaamnfv
घरच्या मैदानावर संयुक्तपणे सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसरा खेळाडू : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजीची शैली सुरुवातीपासूनच दिसून आली, ज्यात त्यानं कोणत्याही इंग्लिश गोलंदाजाविरुद्ध दया दाखवली नाही. अभिषेकनं 79 धावांच्या खेळीदरम्यान 5 चौकार आणि 8 षटकार मारले. अभिषेकनं त्याच्या डावात 232.35 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. आता तो युवराज सिंगसह घरच्या मैदानावर भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याच्या खेळीदरम्यान, अभिषेकनं फक्त 20 चेंडूत 50 धावांचा टप्पा गाठला.
WELL DONE, ABHISHEK SHARMA. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 22, 2025
- 79 (34) with 5 fours and 8 sixes, smashed boundaries for fun in a 133 chase. A stylish knock by Abhishek at the Eden Gardens. 👌 pic.twitter.com/OiM2YwpZCe
भारतासाठी घरच्या मैदानावर सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारे खेळाडू :
- सूर्यकुमार यादव - 18 चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका (गुवाहाटी, 2022)
- गौतम गंभीर - 19 चेंडू विरुद्ध श्रीलंका (नागपूर, 2009)
- अभिषेक शर्मा - 20 चेंडू विरुद्ध इंग्लंड (कोलकाता, 2025)
- युवराज सिंग - 20 चेंडू विरुद्ध श्रीलंका (मोहाली, 2009)
हेही वाचा :