मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.2) टर्मिनल 2 इथल्या पार्किंगमध्ये घडली.
अपघातात पाचजण जखमी : पार्किंगच्या भागात असलेल्या गतीरोधकावर ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटरवर पाय पडल्यानं हा अपघात झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या घटनेतील जखमींमध्ये झेक प्रजासत्ताकच्या दोन नागरिकांचा आणि विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विदेशी नागरिकांना नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर, विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कूपर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये वाहन चालकाने मद्याचे किंवा अंमली केल नसल्याचं समोर आलं आहे.
टर्मिनल २ वर नेहमीच असते प्रवाशांची वरदळ : विमानतळावर एमएच ०१ ईई ७०९८ या क्रमांकाच्या वाहनाचा अपघात झाला. मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. टर्मिनल २ वरुन सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि काही देशांतर्गत उड्डाणे होतात. त्यामुळं टर्मिनल २ वर नेहमीच गर्दी असते. प्रवेशद्वार क्रमांक ३ जवळ असलेल्या उतारावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्यानं हा अपघात झाला.
गुन्हा दाखल करुन चालकाला अटक : ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर पाय दिल्यानं वाहनावरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळं हा अपघात झाला. सहार पोलिसांनी या प्रकरणी वाहन ताब्यात घेतलं आहे. तसंच चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी आरोपी वाहन चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती सहार पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा :