कटक IND vs ENG 2nd ODI Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघात पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज 09 फेब्रुवारी रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यातील पहिल्या सामन्यात भारतानं 4 विकेटनं विजय मिळवला आहे. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यापुर्वी पाच सामन्यांची T20 मालिकाही भारतानं 4-1 नं जिंकली. ही वनडे मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तयारीचा एक भाग आहे. विशेष म्हणजे कटकच्या मैदानावर टीम इंडिया जवळजवळ 6 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे.
Nagpur ✅
— BCCI (@BCCI) February 8, 2025
Hello Cuttack! 👋#TeamIndia have arrived for the 2nd #INDvENG ODI @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XhdtAixiyF
पहिल्या वनडेत भारताचा विजय : तत्पुर्वी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडला फक्त 248 धावांवर रोखलं. यानंतर, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या मदतीनं टीम इंडियानं 40 षटकांत विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड या सामन्यात मुसंडी मारुन मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 108 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतानं 59 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडनं 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले. दोन्ही संघांमधील हा सामना नेहमीच रोमांचक राहिली आहे, ज्यात भारतानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कटकच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये खेळला गेला होता, जो टीम इंडियानं 15 धावांनी जिंकला होता.
A solid win in the bag for #TeamIndia! 💪 💪
— BCCI (@BCCI) February 6, 2025
They beat England by 4⃣ wickets in Nagpur & take 1-0 lead in the ODI series! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lJkHoih56n
कटकच्या मैदानावर टीम इंडियानं खेळले 19 सामने : जर आपण कटकच्या बाराबती स्टेडियमबद्दल बोललो तर आतापर्यंत इथं 21 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 19 सामने भारतीय संघानं खेळले आहेत. इथं खेळल्या गेलेल्या 21 वनडे सामन्यांपैकी 2 सामने रद्द झाले तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 12 सामने जिंकले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 7 सामने जिंकता आले. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 पैकी 13 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 225 ते 230 धावा झाल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी (रविवार) रोजी कटक येथील बाराबती क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता खेळला जाईल. याचा टॉस अर्धातास आधी होईल.
Defeat in Nagpur.
— England Cricket (@englandcricket) February 6, 2025
India take the series opener.
Match Centre: https://t.co/mjJ55wZD0F
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/qUkwshn6WC
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी वनडे मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपित केली जाईल. क्रिकेट प्रेमी हे रोमांचक सामने त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, डिजिटल प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली/ यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)/केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : जॉस बटलर (कर्णधार), बेन डकेट, जो रुट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, साकिब महमूद
हेही वाचा :