कॅनबेरा AUSW vs ENGW 2nd T20I Live Streaming : महिला अॅशेस 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज 23 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल इथं खेळवला जाईल. पहिल्या T20 सामन्यात यजमान संघानं इंग्लंडचा 57 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. परणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
Searching for our first win of 2025, let's goooo 👊 pic.twitter.com/alDOnWkR02
— England Cricket (@englandcricket) January 22, 2025
पहिल्या सामन्यात काय झालं : 20 जानेवारी रोजी सिडनीत झालेल्या पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 198 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 199 धावा करायच्या होत्या, मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला आणि 16 षटकांत फक्त 141 धावांवर सर्वबाद झाला.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रोकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा असल्याचं दिसून येतं. दोन्ही संघांनी आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियन संघानं 24 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. तर, 7 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
IT’S GO TIME!! 🏏 🏆
— Manuka Oval (@ManukaOval) January 22, 2025
The CommBank Women's Ashes T20 International between Australia and England is at Manuka Oval today.
🎟️ Tix: https://t.co/qhLUPBRpAO
For faster entry, see: https://t.co/G5759bZfGE@AusWomenCricket @englandcricket @CricketACT #canberra #Cricket #ManukaOval pic.twitter.com/5pNpyC61v4
कॅनबेराची खेळपट्टी कशी असेल : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल इथं खेळला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा मनुका ओव्हलमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. मनुका ओव्हल फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली मदत करते. या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला उसळी मिळू शकतो. पॉवरप्लेमध्ये जलद गोलंदाज लवकर स्विंगचा फायदा घेऊ शकतात. या ट्रॅकवर प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय ठरु शकतो.
Hunting an #Ashes series win! 😤 pic.twitter.com/PUba8WM670
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) January 22, 2025
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात दुसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात दुसरा T20 सामना 23 जानेवारी (गुरुवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 01:45 वाजता मनुका ओव्हल, कॅनबेरा इथं खेळला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात दुसरा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघातील T20 मालिका भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे अधिकृतपणे प्रसारित केली जाईल. अशा परिस्थितीत पहिला T20 सामना स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. यासोबतच, या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
They're not going anywhere 😎 #Ashes pic.twitter.com/quV4hJUrE7
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) January 20, 2025
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर :
- ऑस्ट्रेलिया : जॉर्जिया वोल, बेथ मुनी (यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
- इंग्लंड : माया बोचियर, डॅनिएल वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), फ्रेया केम्प, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.
हेही वाचा :