ETV Bharat / spiritual

महाशिवरात्री 2025: 'या' राशींना मिळणार भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद, प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 26 FEBRUARY 2025

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. तर मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ या महादेवांच्या सर्वांत प्रिय राशी आहेत. जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

राशीभविष्य
Horoscope (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 2:03 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असणार आहे. आज नोकरीत वरिष्ठांबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडं लक्ष द्याल आणि त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिकदृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. कामाच्या व्यापामुळं कामात दिरंगाई होईल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील आणि भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासानं मन प्रसन्न झालं तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावं लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी मतभेद झाल्यानं मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.

कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र आणि स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.

सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगलं सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. आईच्या घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील आणि लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस चिंतापूर्ण असून या ना त्या कारणानं काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि आरोग्यविषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर-सट्टापासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक थकवा आणि मानसिकदृष्टया आपण व्यस्त राहाल. आईविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचं असेल. एखादी मानहानी संभवते.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचं संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्यानं मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळं कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. दूर राहणार्‍या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपलं वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासानं एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज कोणाला जामीन राहणं, पैसे देणं-घेणं करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजानं भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचं भलं करण्याच्या नादात आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या. दुर्घटनेपासून जपा.

मीन (PISCES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी आणि संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.

हेही वाचा -

काय आहे महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त?; पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी दान करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.